Gas Cylinder Price Hike Dainik Gomantak
देश

Gas Cylinder Price Hike: महागाईचा चटका! गॅस सिलिंडर थेट 195.50 रुपयांनी महागला, नवे दर आजपासून लागू

Cylinder Price Hike: जागतिक स्तरावर, विशेषतः मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय बाजारपेठेला बसू लागला आहे.

Sameer Amunekar

LPG Gas Price Hike

जागतिक स्तरावर, विशेषतः मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय बाजारपेठेला बसू लागला आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असतानाच, सर्वसामान्य व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १९५.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. सुदैवाने, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या दरवाढीमुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर कडाडले आहेत. राजधानी दिल्लीत कमर्शियल सिलिंडर १९५.५० रुपयांनी महागला असून आता त्याची किंमत २०७८.५० रुपये झाली आहे. मुंबईत १९६ रुपयांच्या वाढीसह सिलिंडर २०३१ रुपयांवर पोहोचला आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे २१८ आणि २०३ रुपयांची वाढ झाली असून, कोलकात्यात आता एका सिलिंडरसाठी २२०८ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक बोजा

आजपासून लागू झालेल्या या नवीन दरांमुळे रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. १ मार्च रोजी ११४.५ रुपये आणि ७ मार्च रोजी ११५ रुपयांची वाढ झाल्यानंतर, आता थेट २०० रुपयांच्या आसपास झालेली ही वाढ व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारी ठरू शकते.

घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा

व्यावसायिक सिलिंडर महागला असला तरी, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीत घरगुती सिलिंडर अजूनही ९१३ रुपयांना उपलब्ध आहे. शेवटची दरवाढ ७ मार्च रोजी ६० रुपयांच्या स्वरूपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यानुसार तेल कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला दरांचा आढावा घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT