CJI DY Chandrachud Dainik Gomantak
देश

CJI DY Chandrachud: ''कायद्याचे शिक्षण दुर्गम भागापर्यंत पोहोचवले पाहिजे...''; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या महत्त्वाच्या गोष्टी!

CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले.

Manish Jadhav

CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'कायद्याचे उच्च शिक्षण दुर्गम ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले पाहिजे.' छोट्या शहरातील विद्यार्थ्यांना वकील बनण्याच्या संधीपासून वंचित ठेवता कामा नये, यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, डॉ राजेंद्र प्रसाद नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या उद्घाटन समारंभात चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. चंद्रचूड म्हणाले की, “तंत्रज्ञानाने आपल्याला दूरस्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता दिली आहे. कायद्याच्या शिक्षणात प्रगती झाली असूनही, समकालीन कायदेशीर शिक्षण (Education) प्रणाली केवळ इंग्रजी भाषिक शहरी मुलांसाठी अनुकूल आहे. पाच विधी विद्यापीठांमधील विविधतेवर केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की इंग्रजी न बोलता येत असल्यामुळे विविध पार्श्वभूमीतील मुलांना या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही.”

हिंदीत कायद्याचा अभ्यास करण्याबाबत उल्लेख केला

दरम्यान, CJI चंद्रचूड प्रयागराजमध्ये होते. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाशी संबंधित आपल्या जुन्या आठवणीही शेअर केल्या. ते म्हणाले की, मी अलाहाबाद उच्च न्यायालयात असतानाही बहुतेक वकील माय लॉर्ड म्हणत हिंदीतून युक्तिवाद सुरु करायचे. ते पुढे म्हणाले की, त्यानंतर ते त्यांच्या बॉम्बे शैलीत भाषांतर करायचे.

दरम्यान, CJI चंद्रचूड प्रयागराजमध्ये होते आणि त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाशी संबंधित आपल्या जुन्या आठवणीही शेअर केल्या. ते म्हणाले की, मी अलाहाबाद उच्च न्यायालयात असतानाही बहुतेक वकील माय लॉर्ड म्हणत हिंदीतून युक्तिवाद सुरु करायचे. ते पुढे म्हणाले की, त्यानंतर ते त्यांच्या बॉम्बे शैलीत भाषांतर करायचे.

CJI चंद्रचूड पुढे म्हणाले की, ''आपण शिक्षणात समानतेबद्दल तेव्हाच बोलू शकतो जेव्हा समतेचा विचार संपूर्ण समाजात लागू होईल आणि लोक त्यांच्या हक्कांबद्दल बोलू शकतील.'' देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचेही त्यांनी स्मरण केले.

CJI पुढे म्हणाले की, 'प्रसाद यांनी प्रयागराजमधून (Prayagraj) कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यांचे नाव देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून पुढे आले होते. कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता होती.' सरन्यायाधीशांना मुन्शी प्रेमचंद यांचीही आठवण झाली. सरन्यायाधीश म्हणाले की, मुन्शी प्रेमचंद म्हणाले होते की, आपली शिक्षणपद्धती सामाजिक भान जागवत नाही. आपल्या शिक्षणाचे ध्येय सर्वांचे कल्याण असले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT