Chinese Infiltration Dainik Gomantak
देश

Chinese Infiltration: भारतीय कंपन्यांमध्ये ‘चीनी’ घुसखोरी; धक्कादायक माहिती आली समोर

देशातील किती कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूकदार किंवा भागधारक आहेत, याची माहिती सरकार देऊ शकले नाही कारण ही माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

भारत आणि चीन यांच्यातील संबंध दिवसेंदिवस कठीण होत चालले आहेत, त्यावरून भारत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकेल असे दिसते, पण सोमवारी सरकारने चीनशी संबंधित धक्कादायक आकडेवारी संसदेत मांडली. देशात सुमारे २०० चिनी कंपन्या परदेशी कंपन्या म्हणून नोंदणीकृत आहेत आणि भारतीय कंपन्यांमधील चिनी संचालक देखील देशातील ३,५०० हून अधिक कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असल्याची माहिती संसदेत देण्यात आली.

देशात किती चिनी कंपन्या?
देशात किती चिनी कंपन्या व्यवसाय करत आहेत? याबाबत सोमवारी सरकारने संसदेत सांगितले. संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग म्हणाले की, देशात १७४ चीनी कंपन्या परदेशी कंपन्या म्हणून नोंदणीकृत आहेत. या चिनी कंपन्यांची कार्यालये भारतात आहेत मात्र, देशातील किती कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूकदार किंवा भागधारक आहेत, याची माहिती सरकार देऊ शकले नाही कारण ही माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नाही.

किती कंपन्यांचे चीनी संचालक
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात ३,५६० कंपन्या अशा आहेत, जिथे संचालक पदावर चीनी विराजमान आहेत. लोकसभेत प्रश्नाला उत्तर देताना राव इंद्रजीत सिंह म्हणाले की, कॉर्पोरेट डेटा मॅनेजमेंटच्या (CDM) आकडेवारीनुसार भारतात एकूण ३,५६० कंपन्याचे संचालक चिनी आहेत. दरम्यान, भारत आणि चीनमधील व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार भारत अनेक गोष्टींसाठी चीनवर अवलंबून आहे, ही चिंतेची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

Goa Heavy Rain: सत्तरीत वादळी वाऱ्यामुळे 27 ठिकाणी झाडे कोसळली; पडझड सुरूच, अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

Goa Fraud Case: फरार बलरामच्या शोधासाठी विमानतळांवर 'अलर्ट'; ED अधिकाऱ्याचे सोंग घेऊन लूट, 'इंटर ऑपरेबल सिस्टिम'द्वारे शोध सुरू

Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

SCROLL FOR NEXT