Chinese Foreign Minister Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चीनी परराष्ट्रमंत्री दिल्लीत दाखल

जम्मू-काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज दिल्लीत दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते उद्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेणार आहेत. दोन वर्षांतील चीनची ही पहिली उच्चस्तरीय भारत भेट असणार आहे. ही भारत भेट वांग यी यांच्या दक्षिण आशिया दौऱ्याचा एक भाग आहे. किंबहुना, त्यांचा हा दौरा पाकिस्तानमधील (Pakistan) एका कार्यक्रमात काश्मीरवरील त्यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या ताज्या वादाच्या एक दिवसानंतर आला आहे. ज्याला भारताने (India) ‘अनावश्यक’ वक्तव्य असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे देखील भारताने म्हटले आहे. आणि विशेष म्हणजे हे पाकिस्तान आणि चीनलाही माहीत आहे. (Chinese Foreign Minister arrives in Delhi)

दरम्यान, चीनचे मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानातील इस्लामिक सहकार्य संघटनेच्या कार्यक्रमात काश्मीरचा उल्लेख केला होता. ते यावेळी म्हणाले, "आम्ही आज काश्मीर मुद्यावर आमच्या अनेक इस्लामिक मित्रांचे म्हणणे पुन्हा एकदा ऐकले आहे. आणि चीनलाही अशीच अपेक्षा आहे."

त्यांच्या या वक्तव्यानंतर मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, "जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. चीनसह इतर देशांना टिका-टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. यावर." कोणताही अधिकार नाही. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भारत आपल्या अंतर्गत मुद्द्यांवर कोणत्याही देशाने बोलू नये."

तसेच, 2020 च्या वसंत ऋतूमध्ये, लडाखमधील विविध ठिकाणी पीएलए सैन्याने केलेल्या घुसखोरीमुळे गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत 20 भारतीय आणि अनेक चिनी सैनिक मारले गेले होते. तेव्हापासून भारत आणि चीनमधील संबंध बिघडले आहेत. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत चीनसोबत सामान्य संबंध ठेवणार नसल्याचे भारताने म्हटले आहे.

शिवाय, दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र त्यात यश आले नाही. वांग यी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही या घटनेनंतर दोनदा भेट झाली, सप्टेंबर 2020 मध्ये मॉस्कोमध्ये आणि सप्टेंबर 2021 मध्ये दुशान्बे मध्ये मात्र कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT