Pangong Tso Lake Dainik Gomantak
देश

'ड्रॅगन' ची नवी चाल, पॅंगॉन्ग त्सो सरोवराजवळ उभारतोय पूल

पूर्व लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पॅंगॉन्ग त्सो सरोवराजवळ (Pangong Tso Lake) चीन दुसरा पूल बांधत आहे.

दैनिक गोमन्तक

पूर्व लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पॅंगॉन्ग त्सो सरोवराजवळ चीन दुसरा पूल बांधत आहे. ज्यामुळे चिनी सैन्याला आपले सैन्य या भागात त्वरीत हलवता येईल. सॅटेलाइट इमेजेस आणि या प्रकरणाशी परिचित तज्ञांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ पूर्व लडाखमध्ये अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा पूल बांधला जात आहे. दुसरीकडे मात्र, चीनच्या नवीन बांधकामावर भारतीय संरक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा टिप्पणी आलेली नाही. (China Building News Bridge Near Pangong Tso Satllite Imagery)

चीनने आधीच पूल बांधला

ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय सैन्याने पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील अनेक मोक्याची शिखरे काबीज केल्यानंतर चीन आपल्या लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत आहे. लष्करी तयारी वाढवण्याच्या एकूण प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीन सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. चीनने (China) या भागातील पहिल्या पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण केल्याचे समजत आहे. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पूल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) 20 किमीच्या परिसरात बांधण्यात येत आहे.

स्थिती पूर्ववत ठेवण्यावर भारताचा भर

गतिरोध होण्याआधी स्थिती पूर्ववत ठेवण्यासाठी भारत आग्रही आहे. पूर्व लडाखमधील वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत 15 फेऱ्या लष्करी चर्चेच्या झाल्या आहेत. चर्चेचा परिणाम म्हणून, दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षी पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनारी आणि गोगरा परिसरात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी एलएसीवरील (LAC) शांतता अत्यावश्यक असल्याचे भारताने (India) सातत्याने सांगितले आहे. दोन्ही देशांचे सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे 50,000 ते 60,000 सैनिक तैनात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT