CM Nitish Kumar Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा ढिसाळपणा, सभेच्या ठिकाणी बॉम्ब स्फोट

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे.

दैनिक गोमन्तक

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. नालंदामधील त्यांच्या कार्यक्रमाजवळ एका अज्ञात व्यक्तीने स्फोट घडवून आणला, ज्यामुळे एकच गोंधळा उडाला. चोख बंदोबस्त असतानाही मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या सुरक्षेत कमालीची उणीव दिसून आली. काही दिवसांपूर्वी बख्तियारपूरमध्ये एका माथेफिरु तरुणाने हल्ला केल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. असे असतानाही मंगळवारी त्यांच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने स्फोट घडवून आणला. त्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे माथेफिरु तरुणाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

दरम्यान, या दिवसांत जनसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या नालंदा लोकसभा मतदारसंघातील सातही विधानसभा मतदारसंघांना भेट देत आहेत. या यात्रेदरम्यान कामगार आणि सामान्य नागरिकांची मुख्यमंत्री भेट घेत आहेत. याच भागात आज सिलाओ, पावपुरी आणि राजगीरमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिलाओमधील गांधी हायस्कूलच्या मैदानात ते जनसंवाद कार्यक्रमात लोकांना भेटत असताना तिथून आवाज आला. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

याशिवाय, कार्यक्रमादरम्यान माचीस आणि अनेक फटाकेही जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेला तरुण हा इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी त्याच्या हेतूसंबंधी तपास करत आहेत. मात्र, या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला किंवा अशी घटना त्यांच्या सुरक्षेमधील मोठी चूक असल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT