Chhattisgarh Woman Assault Dainik Gomantak
देश

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

Chhattisgarh Woman Assault Case: छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक, अमानवी आणि लाजिरवाणी घटना समोर आली.

Manish Jadhav

Chhattisgarh Crime News Husband Arrested: छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक, अमानवी आणि लाजिरवाणी घटना समोर आली. येथील पाटणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 35 वर्षीय महिलेवर तिच्याच पतीने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून अंगावर काटा आणणारा अत्याचार केला.

चार निष्पाप मुलांसमोर पतीने पत्नीचे दोन्ही हात बांधून तिचे जबरदस्तीने मुंडण केले आणि इतकेच नव्हे तर या अमानुष कृत्याचा व्हिडिओदेखील बनवून घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस (Police) प्रशासनात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पावले उचलत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 14 जून रोजी पांडोपारा गावात घडली. पीडित महिला मूळची सूरजपूर जिल्ह्यातील असून 15 वर्षांपूर्वी तिने जितेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. या दोघांना चार मुले असून ती सध्या वडिलांसोबतच राहतात. गेल्या एक वर्षापासून जितेंद्र पत्नीला सोडून वेगळा राहत होता, ज्यामुळे ही महिला प्रचंड आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करत होती. या कठीण काळात समाजातील रमेश नावाचा एक व्यक्ती तिला मदत करत होता. याच मदतीच्या अनुषंगाने ती 11 जून रोजी पांडोपारा येथील रमेशच्या घरी आली होती. मात्र, पती जितेंद्र हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तो प्रचंड संतापलेला होता.

14 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जितेंद्र तिथे पोहोचला आणि त्याने पत्नीला घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्याने तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने तिचे कपडे फाडले, जोड्याने मारहाण केली आणि केस ओढून अनेक चापट्या मारल्या. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिचे हात बांधले आणि कात्री व ब्लेडच्या साहाय्याने तिचे केस कापून डोक्याचे मुंडण केले. यानंतर तिच्या चेहऱ्याला आणि शरीराला काळे फासण्यात आले. पीडितेने पतीवर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की, या छळादरम्यान पतीने तिला बळजबरीने मूत्र पिण्यासही भाग पाडले.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या थरारक व्हिडिओमध्ये महिलेचे हात-पाय बांधलेले स्पष्ट दिसत असून, तिचा पती तिला अमानुषपणे मारहाण आणि मुंडण करताना दिसत आहे. गुरुवारी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाटणा पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी पती जितेंद्रला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

गोव्यात 'शिवसेने'ची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदारसंघात शाखा, 30 जागांवर विजयाचे लक्ष्य

मराठी आणि गोव्याचे सीमारेखन

SCROLL FOR NEXT