Chhattisgarh High Court has recently said that if a wife raises doubts about a husband coming home late at night, it cannot be called cruelty. Dainik Gomantak
देश

पती वारंवार उशिरा घरी येत असल्यास पत्नीने संशय घेणे क्रूरता नाही: हायकोर्ट

Husband Wife Relation: "पती-पत्नीच्या नातेसंबंधात, एकमेकांवरील विश्वासाचा किमान दर्जा राखला गेला पाहिजे आणि अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही की, पत्नीने नवऱ्याच्या इच्छेनुसार बाहेरील लोकांशी बोलवे किंवा बोलायचे टाळावे.

Ashutosh Masgaunde

Chhattisgarh High Court has said that if a wife raises doubts about a husband coming home late at night, it cannot be called cruelty:

जर एखादा पती रात्री उशिरा घरी येत असेल आणि त्याचे काही अफेअर आहे की नाही याबद्दल पत्नीने शंका व्यक्त केली, तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असे नुकतेच छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती दीपक कुमार तिवारी यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, अशा परिस्थितीत पत्नीचे असे वर्तन 'सामान्य मानवी वर्तन' होते.

हे एक सामान्य मानवी वर्तन आहे आणि स्पष्ट आहे की, जेव्हा एखादा पती रात्री उशिरा येतो तेव्हा पत्नीच्या मनात काही शंका येऊ शकतात आणि जर अशा संशयाला वाव असेल तर ती क्रूरता म्हणता येणार नाही.
छत्तीसगड उच्च न्यायालय

न्यायालय एका खटल्याची सुनावणी करत होते, ज्यामध्ये पती वारंवार रात्री उशिरा घरी येत असे. काही वेळा तो घरीच येत नसे, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

पतीने असा दावा केला की, तो राजकीय कामात गुंतला होता त्यामुळे त्याला घरी पोहोचण्यास उशीर व्हायचा. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी क्रूरपणे वागते, असा पतीच्या वतीने युक्तिवाद केला.

कौटुंबिक न्यायालयाने याआधी पतीच्या घटस्फोटाच्या याचिकेला परवानगी दिली होती, ज्याला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पतीचे वर्तन वेगळे असते किंवा नीट समजावून सांगितले असते तर पत्नीला संशय आला नसता, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

यावेळी पतीने, पत्नी आपल्या भावाच्या मित्रांशी बोलत असल्याच्या कारणावरून तिच्यावर उलट संशय घेतला होता, असेही खंडपीठाने नमूद केले. दोन्ही पती-पत्नींचा एकमेकांवर विश्वास असायला हवा, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.

"पती-पत्नीच्या नातेसंबंधात, एकमेकांवरील विश्वासाचा किमान दर्जा राखला गेला पाहिजे आणि अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही की, पत्नीने नवऱ्याच्या इच्छेनुसार बाहेरील लोकांशी बोलवे किंवा बोलायचे टाळावे.

यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नीवर लावलेले क्रूरतेचे आरोप घटस्फोट मंजूर करण्यासाठी अपुरे आहेत. न्यायालयाचे असे मत होते की, पतीच्या चारित्र्याबद्दल निर्माण झालेल्या संशयाचा परिणाम त्याच्या असामान्य वर्तनाचा परिणाम होता, विशेषत: रात्री उशिरापर्यंत तो घरी परतत नसल्यामुळे.

पोटगीच्या संदर्भात, न्यायालयाने पत्नीचे आर्थिक स्वातंत्र्य मान्य केले, कारण ती सरकारी शिक्षिका म्हणून काम करत होती. तरीही पतीची बऱ्यापैकी संपत्ती पाहता न्यायालयाने त्याला पत्नीला पोटगी म्हणून दरमहा ४५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT