Punjab Haryana High Court Dainik Gomantak
देश

Punjab-Haryana HC: सुसाईड नोटमधील नाव एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही

उच्च न्यायालयाने सोनीपत जिल्हा न्यायालयाने सुनावलेला 5 वर्षांच्या शिक्षेचा आदेश बाजूला ठेवत याचिकाकर्त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Punjab Haryana High Court: पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय देताना स्पष्ट केले की, केवळ सुसाईड नोटमधील नावाच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ शकत नाही. अशाच एका प्रकरणात, उच्च न्यायालयाने सोनीपत जिल्हा न्यायालयाने सुनावलेला 5 वर्षांच्या शिक्षेचा आदेश बाजूला ठेवत याचिकाकर्त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सोनीपत येथील रहिवासी असलेल्या रवी भारती यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले होते.

दुसरीकडे, याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, केवळ सुसाइड नोटमधील नावाच्या आधारे, सोनीपत जिल्हा न्यायालयाने याचिकाकर्त्याला 2 मे 2022 रोजी दोषी ठरवले. विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे याचिकाकर्त्याने नमूद केले.

तसेच, सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याचे अपील मान्य केले. केवळ सुसाईड नोटमधील नावाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीचा मृत व्यक्तीशी काय संबंध आहे, आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त करण्याचे कारण काय आणि सुसाईड नोटमध्ये दिलेले कारण खरोखरच एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करु शकते का, हे लक्षात घेतले पाहिजे.

शिवाय, हॅडराइटिंग एक्सपर्टचा सल्ला घेतल्यानंतरच तपास अधिकाऱ्याने पुढे जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही निरीक्षणे नोंदवून उच्च न्यायालयाने अपील मंजूर करुन याचिकाकर्त्याच्या सुटकेचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT