Curbs On Sugar Export Dainik Gomantak
देश

Curbs On Sugar Export: साखर निर्यातीवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती

देशातील महागाईवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Curbs On Sugar Export: केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची किंमत पाहून १ जून २०२२ पासून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. साखरेच्या विक्रमी निर्यातीनंतर साखरेच्या दरात वाढ झाली होती.

भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तसेच ब्राझिलनंतर सर्वाधिक साखर निर्यात करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि दुबई हे भारतीय साखरेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत.

या वर्षी 82 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात

गतवर्षी देशातून साखरेची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे लक्ष्य होते, पण त्याहुन १० लाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच एकुण ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली गेली. तसेच या वर्षीही 82 लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली गेली. यावर्षीची साखर निर्यात ही आत्तापर्यंतची सर्वाधिक साखर निर्यात आहे.

साखर निर्यातीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी योजना अत्यंत दक्षतेची आहे. कारण देशांतर्गत वापरात साखर आता पुरेशी प्रमाणात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या माहितीनुसार भारतात या हंगामात 35 दशलक्ष टन उत्पादन 27 दशलक्ष टन वापर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच गत हंगामातील 8.2 दशलक्ष टन साठ्यासह 16 दशलक्षल टनाचा अतिरिक्त साठा आहे. दरम्यान, यापुर्वी केंद्र सरकारने गहुच्या वाढत्या दरामुळे मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवरही बंदी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

SCROLL FOR NEXT