16 FDC Drugs Banned Dainik Gomantak
देश

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

Central government ban on FDC drugs: सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने १६ ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने १६ ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. कोणत्याही समाधानकारक वैद्यकीय कारणमीमांसेविना या औषधांचा वापर सुरू होता. त्यांच्या सेवनानंतर संभाव्य धोक्यांच्या तुलनेत ते फारसे लाभदायक नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि औषधांचा तर्कसंगत प्रभावी वापर वाढवणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ‘एफडीसी’ औषधे म्हणजे दोन किंवा अधिक सक्रिय औषधी घटकांचे (एपीआय) ठराविक प्रमाणात केलेले मिश्रण असते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एफडीसी औषधांच्या पुनरावलोकनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (डीटीएबी) विविध औषध मिश्रणांची तपासणी करण्यासाठी अन् वैद्यकीय आधार नसलेली किंवा संभाव्य हानिकारक, धोकादायक औषधे निवडण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

प्रतिबंधित औषधे

बंदी घालण्यात आलेल्या औषधांच्या मिश्रणांमध्ये ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडसह इथोहेप्टाझिन; डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल आणि क्लिडिनियम ब्रोमाइड; डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल, क्लिडिनियम ब्रोमाइड आणि क्लोरडायझेपॉक्साइड; ग्लिक्लाझाइडसह क्रोमियम पिकोलिनेट आणि पॅरासिटामॉलसह लिग्नोकेन यांचा समावेश आहे.

याशिवाय, अनेक प्रतिजैविकांच्या (अँटीबायोटिक्स) मिश्रणांवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित औषध यादीत त्वचाविकारांशी अन् त्वचेची निगा राखणाऱ्या मिश्र औषधांचाही समावेश असून, त्यात कोरफड (अलोवेरा) किंवा कोरफडीच्या अर्कासह व्हिटॅमिन ई, जोजोबा ऑईल, ऑरेंज ऑईल, व्हीट जर्म ऑईल, टी ट्री ऑईल, अलँटोइन आणि डी-पँथेनॉल यांसारख्या घटकांचे मिश्रण असलेल्या औषधांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT