कोरोना (COVID-19) लसीकरणात (Corona Vaccination) मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारकडून ‘हर घर दस्तक’ (Har Ghar Dastak) ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लोकांना कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी बुधवारी ही माहिती दिली असून ते म्हणाले की, लवकरच 'हर घर दस्तक' मोहीम सुरू केली जाईल आणि लोकांना कोरोना संसर्गाविरूद्ध लस घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.(Central Government announce Har Ghar Dastak for Cpvid-19 vaccination)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुमारे 48 जिल्हे असे निवडले आहेत जेथे पात्र लाभार्थ्यांपैकी 50% पेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतला आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य मंत्री म्हणाले, 'असा कोणताही जिल्हा नसावा जिथे संपूर्ण कोरोना लसीकरण झाले नाही.'म्हणून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.त्याचबरोबर त्यांनी , 'कोराना लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात हर घर दस्तक अभियान सुरू केले जाईल. सर्व पात्र लोकांना नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस कोराना लसीचा पहिला डोस मिळावा.'असे सांगितले आहे मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2 नोव्हेंबर रोजी धन्वंतरी जयंतीनिमित्त हे अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतातील 76 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व पात्र लोकांना त्यांचा पहिला डोस दिला आहे.लक्षद्वीप, सिक्कीम, गोवा, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मिझोराम, दमण आणि दीव, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर ही राज्ये आहेत जिथे 100% प्रौढ लोकसंख्येला लसीकरण झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूएस देशातील अंदाजे 94 कोटी प्रौढांपैकी 32 टक्क्यांहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.