Medicine  Dainik Gomantak
देश

Pharma Company License Cancelled: केंद्र सरकारची मोठी कारवाई! 18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द

बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Pharma Company License Cancelled:  गेल्या वर्षी उजबेकिस्तानमध्ये भारतीय कंपनीचे कफ सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून औषध उत्पादन आणि निर्मिती कंपन्यांची चांगलीच तपासणी केली जात आहे.

बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (28 मार्च) केलेल्या कारवाईमध्ये 18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे.

या कंपन्यांवर बनावट आणि निकृष्ट औषध बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांना उत्पादन थांबवण्याचे सांगण्यात आले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली जात आहे.

केंद्र सरकार आणि राज्याच्या आरोग्य पथकांनी 20 राज्यांतील औषध उत्पादन कंपन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून ही मोहीम सुरू होती.

अनेक देशांमधुन भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले होते.

गेल्या महिन्यात गुजरातमधील फार्मा कंपनी Zydus Lifesciences ने अमेरिकेतून (America) जेनेरिक औषधाच्या 55 हजाराहून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत हे औषध फेल ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT