CBI Arrests Videocon Chairman | Videocon Chairman Venugopal Dhoot arrested | ICICI Bank fraud case Dainik Gomantak
देश

CBI Arrests Videocon Chairman: व्हिडिओकॉन सर्वेसर्वा वेणूगोपाल धुत यांना सीबीआयकडून अटक

ICICI Bank Loan Scam: आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सीबीआयने वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

ICICI Bank fraud case: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत (Videocon chairman Venugopal Dhoot) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. आज वेणूगोपाल धूत यांना कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.

नियमबाह्य कर्ज वाटपाचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली.

धूत यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचे कर्ज दिले होते. पण या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. पण सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती.

या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं सीईओपद सोडावं लागले होते. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT