Lalu Prasad  Dainik Gomantak
देश

लालू प्रसाद यादव यांच्या 17 ठिकाणांवर CBIचे छापे, भ्रष्टाचाराचा नवा गुन्हा दाखल

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) नेत्या राबडी देवी यांच्या घराचा होणार तपास

दैनिक गोमन्तक

land for railway job scam: बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) नेत्या राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले आहे. चारा घोटाळा प्रकरणात नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय त्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयचे पथक माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानीही पोहोचले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरुद्ध भ्रष्टाचाराचा नवा गुन्हा दाखल केला आहे.

2004 ते 2009 या काळात लालू रेल्वेमंत्री असताना घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सीबीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लालू यादव सध्या दिल्लीत आहेत. त्यांची मुलगी मीसा भारतीही दिल्लीत आहे. राबडी देवी त्यांच्या निवासस्थानी आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT