Drugs  Dainik Gomantak
देश

CBI Against Drugs: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी 175 जणांना अटक

'सीबीआय'ची धडक कारवाई, देशभरात 127 गुन्हे दाखल, 6600 संशयितांची चौकशी

गोमन्तक डिजिटल टीम

CBI Against Drugs: अमली पदार्थाचे देशभरातील जाळे उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने सीबीआयने ऑपरेशन गरूड हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत सीबीआयने देशभरातील 6600 संशयितांची चौकशी केली होती. आता या प्रकरणी देशभरात एकुण 127 गुन्हे सीबीआयने दाखल केले असून तब्बल 175 जणांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने देशासह जागतिक पातळीवरील ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कला सुरूंग लावण्याचे ठरवले अशून त्यासाठी इंटरपोल (Interpol) तसेच देशात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची मदत घेतली जात आहे. इंटरपोलच्या सोबतीने जागतिक पातळीवर अमली पदार्थ तस्करीविरोधात हे मोठे ग्लोबल अभियान सुरू केले आहे. ड्रग ह्रँडलर्स, ऑपरेटिव्हज, निर्मिती केंद्रे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्याविरोधातील ही मोहिम आहे.

त्यासाठी गुप्तचर विभागाचीही मदत घेतली जात आहे. मोहिमेत विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. इंटरपोलसह एनसीबी आणि आठ राज्यातील पोलिस दलाचीही मदत घेण्यात आली आहे. यात पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट, तामिळनाडू, दिल्ली, मणिपुर या राज्यातील पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.

सध्या सीबीआय या संशयितांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची शक्यता तपासत आहे. दरम्यान, या कारवाईत 5.125 किलो हेरॉईन, 3.29 किलो गांजा, 1365 ग्रॅम चरस, 33.80 ग्रॅम मेफेड्रोन 87 गोळ्या, 122 इंजेक्शन, ब्युप्रीनॉर्फिन 87 सीरींज, अल्पाझोलमच्या 946 टॅबलेट, ट्रॅमॅडॉल 105 किलो, हॅश ऑईल 10 ग्रॅम, 0.9 ग्रॅम एक्टॅसी पिल्स, 1.150 किलो अफू, 1.437 किलो इनटॉक्सिकंट पावडर आणि 11 हजार 39 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT