Cash For Job Scam Dainik Gomantak
देश

Cash For Job Scam: शिमल्यातही उघडकीस आले कॅश फॉर जॉब स्कॅम; पैसे उकळून केली गोवा ट्रीप

Shimla Crime News: सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.

Pramod Yadav

शिमला: सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार शिमला, हिमाचल प्रदेश येथे उघडकीस आला आहे. संशयिताने अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळले आणि गोव्यात मौजमजा केली, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली पण, त्याला नुकतेच सत्र न्यायालयातून सशर्त जामीन मिळाला आहे.

कुल्लू जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या संशयित सूरजने जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणावर सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांकडून पैसे उकळण्याचा आणि बनावट जॉइनिंग लेटर जारी केल्याचा आरोप आहे. यानंतर तरुणांकडून घेतलेले पैसे घेऊन संशयिताने गोव्यात येऊन मौजमजा केली.

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दविंदर कुमार यांच्या न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून, आता त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. संशयिताला न्यायालयीन कोठडीत कैथू कारागृहात ठेवण्यात आले होते.

फसवणूक प्रकरणात पोलिसांनी संशयित सूरजला 13 नोव्हेंबर 2024 रोजी अटक केली होती. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे. 8 जुलै 2024 रोजी छोटा शिमला पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 420, 465, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयिताने फसवणूक करुन गोळा केलेली रक्कम गोव्यात खर्च केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर 25 जुलै 2024 रोजी निर्मंड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 420, 467, 468, 471 भादंवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Case: दिनेश गावडेंच्‍या शवचिकित्सा पोस्टमॉर्टमवरून उफाळला वाद; प्रकरण तापले : वन खाते-फॉरेन्सिक विभाग आमनेसामने

Goa Accident: स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले! बांबोळीत मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Tim David Video: मुंबईला हरवलं पण शिस्त विसरला! टीम डेव्हिडचा 'तो' अश्लील इशारा कॅमेऱ्यात कैद; 'BCCI'ने ठोठावला दंड

Horoscope: मंगळवार ठरेल टर्निंग पॉईंट! वैधृति योगाचा चमत्कार; 5 राशींच्या नशिबात मोठा धनयोग

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

SCROLL FOR NEXT