Ramcharitmanas Row | Swami Prasad Maurya Dainik Gomantak
देश

Ramcharitmanas Row: रामचरितमानस दहन प्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा

पुस्तकातून ओबीसी समाजाचा अवमान होत असल्याचा आरोप

Akshay Nirmale

Ramcharitmanas Row: संत तुलसीदास लिखित रामचरितमानस संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर उत्तरप्रदेशात राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशात रामचरितमानसचा वाद सातत्याने वाढत आहे. रविवारी राजधानी लखनौमध्ये रामचरितमानसच्या प्रती जाळण्यात आल्या होत्या. अखिल भारतीय ओबीसी समाज नावाच्या संघटनेने रामचरितमानसच्या या प्रती जाळल्या होत्या. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रामचरितमानसच्या प्रती जाळण्यात सहभागी असलेल्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. लखनौमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी लखनौमध्ये अखिल भारतीय ओबीसी महासभा ही संघटना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली.

लखनौ येथील वृंदावन योजनेत रामचरितमानसच्या वादग्रस्त भागाच्या प्रती जाळून महासभेतर्फे निषेध करण्यात आला. महासभेच्या लोकांचे म्हणणे आहे की, आम्हाला रामचरितमानसमधून महिला शक्ती, शूद्र, दलित समाज आणि ओबीसी समाजाच्या विरोधातील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकायचा आहे. तो काढल्यावर आमचा विरोध थांबेल.

ऐशबाग येथील रहिवासी सतनाम सिंग लावी यांनी रामचरितमानसच्या प्रती जाळल्याप्रकरणी पीजीआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत बोलताना म्हटले होते की, रामचरितमानसच्या काही ओळींमध्ये जात, वर्ण आणि वर्गाच्या आधारे समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान झाला असेल तर तो धर्म नक्कीच नाही.

हा अधर्म आहे. या जातीतील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत." त्यांनी पुस्तकातील जातीय भेदभावाचा भाग वगळण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT