Candle March Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: दिल जीत लिया...! शहीद जवानासाठी काश्मीरी जनता रस्त्यावर, काढला कँडल मार्च

Indian Army: शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज लोकांनी कँडल मार्च काढला.

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार मारुन मशिदीचे नुकसान होण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज लोकांनी कँडल मार्च काढला.

यावेळी, लोकांनी हातात शहीद पवन कुमार यांचा फोटो घेऊन शहीद पवन कुमार अमर रहेच्या घोषणा दिल्या.

मशिदीचे नुकसान होऊ दिले नाही

खरे तर, 28 फेब्रुवारीला, सुरक्षा दलांनी पुलवामाच्या (Pulwama) पदगमपूर भागात एका मशिदीत दोन सशस्त्र दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना घेराबंदी केली.

एका मशिदीत दोन स्थानिक दहशतवादी (Terrorist) लपून बसल्याने सुरक्षा दलांनी अत्यंत संयम बाळगला आणि मशिदीला कोणतेही नुकसान न करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफल्सचे जवान पवन कुमार शहीद झाले.

चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले

आकिब मुश्ताक असे मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचे नाव असून तो मशिदीच्या आवारात मारला गेला. दुसरा दहशतवादी, पुलवामाजवळील तरालचा रहिवासी एजाज अहमद भट म्हणून ओळखला जातो, तो खिडकीतून उडी मारुन मशिदीत लपला होता.

त्यालाही सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी बँक सुरक्षा रक्षक संजय शर्मा यांच्या हत्येत सामील होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT