Calcutta High Court
Calcutta High Court Dainik Gomantak
देश

Calcutta High Court: 'असे प्रकार अमान्य, कोणताही धर्म तुम्हाला असे करण्यास सांगत नाही..' मुहर्रमदरम्यान ढोल वाजवण्यावर कोलकाता HC चे निर्बंध

Manish Jadhav

Calcutta High Court: मुहर्रम 29 ऑगस्ट रोजी आहे. याआधी, गुरुवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मोठी टिप्पणी केली.

न्यायालयाने म्हटले की, 'कोणताही धर्म इतरांच्या शांततेचा भंग करुन प्रार्थना करा असे सांगत नाही. त्यामुळे मुहर्रममध्ये ढोल वाजवता येणार नाहीत. ढोल वाजवण्याच्या वेळेचे नियमन करणारी सार्वजनिक नोटीस पोलिसांनी जारी करावी.'

दरम्यान, एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, मुख्य न्यायमूर्ती टीएस यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला परवानगी असलेल्या पातळीच्या संदर्भात ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने ही सूचना केली

सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ढोल वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. सकाळी शाळेत (School) जाणारी मुलं असतील. वृद्ध आणि आजारी लोक देखील असतील. साधारणपणे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास द्या. सायंकाळी सात वाजल्यानंतर ढोल वाजवू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्याने सांगितले - रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवले जातात

याचिकाकर्त्याने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, त्यांच्या परिसरात मुहर्रम सणाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवण्यात येतात. पोलिसांकडे (Police) मदत मागितली असता, न्यायालयाचा आदेश घेऊन येतो, असे सांगून ते परतले.

आता संघटीत समूहांना परवानगी घ्यावी लागणार

ढोल वाजवण्यासाठी संघटित समूहांना परवानगी घ्यावी लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यांची जागाही निश्चित केली जाईल. याशिवाय कालमर्यादाही निश्चित केली जाईल. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: ....तर गोव्यात भूस्खलनाचा धोका; डॉ. कामत

Margao: 'मला फरक नाही पडत', सरदेसाईंच्या जनता दरबारावर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Goa Traffic Police: बेकायदेशीर होर्डिंग्सविरुद्ध ‘एसओपी’ जारी; धडक मोहीम सुरू

Goa Today's News Live: गोव्यात आज ऑरेंज, पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट

Goa Murder Case: कन्हैयाकुमार मृत्यू प्रकरणी 'तो' ट्रक जप्त, चालक फरार; मायणा-कुडतरी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT