CAA,NRC will not harm to Muslims - Mohan Bhagwat Dainik Gomantak
देश

भारताला पाकिस्तान बनवण्याचा काही लोकांचा डाव- मोहन भागवत

सीएए-एनआरसीचा (CAA-NRC) हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) विभाजनाशी काही संबंध नाही.

दैनिक गोमन्तक

'आपले वर्चस्व प्रस्थापित करून या देशाला पाकिस्तान बनविण्याच्या उद्देशाने 1930 पासून मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचा संघटित प्रयत्न केला गेला आहे. हे पंजाब, सिंध, आसाम आणि बंगालसाठी नियोजित होते आणि काही प्रमाणात ते यशस्वीही देखील झाले आहे.'असे विधान काल गुवाहाटी येथे आरएसएस(RSS) प्रमुख मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांनी केले आहे.

तसेच मोहन भागवत भागवत म्हणाले, सीएए-एनआरसीचा हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) विभाजनाशी काही संबंध नाही. गुवाहाटीमध्ये बुधवारी आसामचे मुख्यमंत्री(Assam Chief Minister) हेमंत बिस्वा शर्मा(Hemant Biswas Sharma) यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एनआरसी-सीएए(CAA-NRC) या पुस्तकाचे लोकार्पण केले.यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसी(NRC) या मुसलमानांच्या भीती दूर करण्याचा प्रयत्न केला . तसेच, त्यांनी दावा केला की काही लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी याला जातीय रंग देत आहेत.

दोन दिवसांच्या आसाम दौर्‍यावर असलेल्या भागवत यांनी नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीमचे नुकसान होणार नाही, असेही प्रतिपादन केले आहे. 'एनआरसी आणि सीएए-आसाम आणि इतिहासाचे राजकारण' या विषयावर पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर भागवत म्हणाले की अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल आणि आतापर्यंत हे केले गेले आहे. आम्ही असे करत राहू. सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमांचे नुकसान होणार नाही.

देशाचे विभाजन झाल्यानंतर भारताने अल्पसंख्यांकांच्या समस्येवर यशस्वीरित्या लक्ष दिले पण पाकिस्तानने तसे केले नाही. त्याने हजारो उत्पीडित हिंदू, शीख आणि जैन कुटुंबांना घरे सोडून भारतात येण्यास भाग पाडले.आणि सीएए त्याच शरणार्थ्यांना मदत करते, तर त्याचा भारतीय मुस्लिमांशी काहीही संबंध नाही.असे प्रतिपादनही मोहन भागवत यांनी केले आहे.

तसेच मोहन भागवत पुढे म्हणाले की, "मुस्लीम कुटुंबांचे भारतात पद्धतशीरपणे स्थलांतर करणे, त्यांची लोकसंख्या एका विशिष्ट मार्गाने वाढविणे, आसामीसह विविध समुदायांसाठी चिंतेची बाब असून लोकांचा मोठा वर्ग सर्व घटनात्मक हक्कांची मागणी करीत आहे. परंतु जरी ते समान घटनेद्वारे परिभाषित केले गेले असले तरी त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास तयार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT