Budget 2026 Dainik Gomantak
देश

Budget 2026: सामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार? काय स्वस्त अन् काय महाग होणार? जाणून घ्या बजेटशी संबंधित मोठ्या अपेक्षा

Union Budget 2026 Updates : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होणार आहे, सर्वसामान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांच्या नजरा अर्थमंत्र्यांच्या घोषणेकडे लागल्या आहेत.

Sameer Amunekar

Budget 2026 Key Points : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होणार आहे, सर्वसामान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांच्या नजरा अर्थमंत्र्यांच्या घोषणेकडे लागल्या आहेत. वाढत्या महागाईच्या काळात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सरकार यावेळी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची शक्यता आहे. विशेषतः प्राप्तिकरातील सवलती आणि 'मेक इन इंडिया'ला चालना देणाऱ्या वस्तूंवर सरकारचा भर असणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये तुमची बचत वाढवण्यासाठी आणि दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी नेमकी काय गणिते मांडली जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काय स्वस्त होऊ शकते?

यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि औषध क्षेत्राला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मोबाईल फोनच्या सुट्या भागांवर (उदा. कॅमेरा मॉड्यूल, डिस्प्ले) कस्टम ड्युटी कमी झाल्यास स्मार्टफोन आणि टॅब्लेट स्वस्त होऊ शकतात. तसेच, कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील औषधे आणि जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी होण्याचे संकेत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटरीवरील टॅक्स घटल्यास इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. याशिवाय, गृहकर्जाच्या व्याजावरील कर सवलत २ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवल्यास हक्काचे घर घेणे स्वस्त पडेल. आरोग्य विम्यावरील १८% जीएसटी कमी झाल्यास पॉलिसीचे प्रीमियमही कमी होऊ शकतात.

काय महाग होऊ शकते?

स्वदेशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी सरकार आयात केलेल्या चैनीच्या वस्तूंवर (Imported Luxury Items) सीमा शुल्क वाढवू शकते. यामुळे परदेशी घड्याळे, महागडे शूज, प्रीमियम कार आणि परदेशी सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) अधिक महाग होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही तंबाकूजन्य पदार्थ, सिगारेट आणि गुटख्यावर 'एनसीसीडी' (NCCD) वाढवला जाऊ शकतो, ज्यामुळे व्यसनी लोकांच्या खिशाला मोठी कात्री लागेल. थोडक्यात सांगायचे तर, ज्या वस्तू भारतात तयार होतात त्या स्वस्त करण्यावर आणि परदेशातून येणाऱ्या चैनीच्या वस्तूंवर अधिक कर लावण्यावर सरकारचा कल असू शकतो.

करदात्यांना 'बंपर' दिलासा मिळण्याची शक्यता

यंदाच्या बजेटचे सर्वात मोठे आकर्षण प्राप्तिकरातील बदल असू शकतात. १५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 'झिरो टॅक्स' देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची चर्चा बाजारात आहे.

तसेच, पगारदार वर्गासाठी 'स्टँडर्ड डिडक्शन' ७५,००० रुपयांवरून थेट १ लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. यामुळे सामान्य माणसाच्या हातात खर्च करण्यासाठी अधिक पैसे उरतील आणि त्यांची क्रयक्षमता (Purchasing Power) वाढण्यास मदत होईल. एकूणच, हे बजेट मध्यमवर्गीयांच्या खिशाला महागाईपासून वाचवणारे आणि बचतीला प्रोत्साहन देणारे ठरेल, अशी दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT