Brutal end of love affair... live-in partner murdered by hitting her head with a cooker in Bengaluru. Dainik Gomantak
देश

प्रेमप्रकरणाचा क्रूर शेवट... लिव्ह इन पार्टनरची डोक्यात कूकर घालून हत्या

हे जोडपे केरळचे असून बंगळुरुच्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दोघांचीही कॉलेजपासून ओळख होती. व तेव्हापासून ते एकमेकांच्या प्रेमात होते.

Ashutosh Masgaunde

Brutal end of love affair... live-in partner murdered by hitting her head with a cooker in Bengaluru:

राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून केला होता. अशीच क्रूर आणि भयानक घटना बंगळुरूमधून समोर आला आहे.

२४ वर्षीय तरुणाने लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लिव्ह इन पार्टनरच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार बंगळुरूमधून (Bengluru) समोर आला आहे.

या प्रकरणी वैष्णव नावाच्या २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीचे इतर पुरूषांशी संबंध असल्याचा संशय या तरुणाला होता, याच रागातून त्याने देवीची निर्घृण हत्या केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, वेष्णव आणि देवी (२४) हे दोघे केरळचे असून बंगळुरुच्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दोघांचेही कॉलेजपासून ओळख होती. ते दोघेही बंगळुरुतील कोरामंगल येथील सेल्स अँड मार्केटिंग कंपनीत काम करतात.

देवीचे इतर पुरूषांशीही संबंध असल्याचा संशय वैष्णवला होता. यावरुन त्यांच्यात सतत वाद व्हायचे. घटनेदिवशीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

यावेळी रागाच्या भरात वैष्णवने देवीच्या डोक्यात प्रेशर कुकर घातला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर वैष्णव पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्यांना पकडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही दोघांच्या संबंधांची माहिती होती. तसेच त्यांच्यामध्ये वाद होत असल्याचंही त्यांना माहिती होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण होताच देवीची बहीण कृष्णाने शनिवारी त्यांना घरी बोलावले आणि दोघांना समजावून सांगितले.

घरी परतल्यानंतर देवी आणि वैष्णव यांच्यात पुन्हा भांडण झाले. पोलिसांनी सांगितले की, रागाच्या भरात वैष्णवने देवीच्या डोक्यावर कुकरने अनेक वार केले, परिणामी तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, वैष्णव हा एका स्थानिक फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. दोघेही न्यू मायको लेआऊटमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

दोघांचे कॉलेजच्या दिवसांपासून अफेअर होते. गुन्हा करून तो फरार झाला होता. त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: ...तर मडगाव बकाल दिसले नसते! विकासकामांसाठी निधीचा व्यवस्थित वापर न झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Hardik Pandya Record: हार्दिक पंड्याचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'! 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Bicholim Market: डिचोलीत बाजारपेठेला लाभला नक्षत्रांचा साज, नाताळाची लगबग; ख्रिसमससाठी खरेदी जोरात

Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

SCROLL FOR NEXT