Booster Dose Dainik Gomantak
देश

केंद्र सरकार नागरिकांना बूस्टर डोस तज्ञांच्या सल्ल्यानुसार देणार

प्रौढांसाठी कोविड लसींचे बूस्टर डोस आणि लहान मुलांसाठी लसीकरणाची मागणी होत आहे.

दैनिक गोमन्तक

Booster Dose: अनेक राज्यांनी (State) प्रौढांसाठी कोविड लसींचे बूस्टर डोस आणि लहान मुलांसाठी लसीकरणाची मागणी केल्यामुळे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी संसदेत यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, सरकार (Government) तज्ञांच्या वैज्ञानिक शिफारसींच्या आधारेच यावर निर्णय घेईल. हे निर्णय आर्थिक किंवा राजकीय (Political) विचारांवर आधारित नसतील.

“आमचे तज्ञ मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस (प्रौढ लोकसंख्येला) देण्याच्या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतील. त्यांच्या शिफारशीच्या आधारे सरकार पुढे जाईल. संसदेच्या मजल्यावर हे माझे स्पष्ट उत्तर आहे,” मांडविया म्हणाले.

मांडविया यांनी देशातील ओमिक्रॉनसह आढळलेल्या दोन रुग्णांचा तपशील देखील प्रदान केला आणि ते म्हणाले की, 66 वर्षीय दक्षिण आफ्रिकन निगरिकाच्या सर्व चाचण्या केल्या गेल्या आहेत.

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे रुग्ण 29 देशांमध्ये आढळून आले आहे. जागतिक स्तरावर या प्रकाराची अंदाजे 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या देशांमध्ये हा प्रकार आढळला आहे, आम्ही त्यांना 'जोखीम' म्हणून वर्गीकृत केले आहे. जोखीम असलेल्या देशांमधून आलेल्या 58 फ्लाइटमधून, 16,000 हून अधिक प्रवासी आले आहेत. या मधील केवळ 18 प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे,” ते म्हणाले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT