Boat Overturns In Mahanadi River Dainik Gomantak
देश

Boat Overturns In Mahanadi River: महानदीत बोट उलटल्याने 7 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 50 ते 60 जण होते बोटीत

Boat Overturns In Mahanadi River: ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.

Manish Jadhav

Boat Overturns In Mahanadi River: ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाथर सेनी मंदिराजवळील महानदीत बोट उलटल्याने 7 जणांचा बुडून मृत्यू झाला. या बोटीत 50 ते 60 जण असल्याची माहिती आहे. काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृत आणि बेपत्ता व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून शोधमोहीम सुरु आहे. पोलिसांच्या पथकासह बचाव पथकही पोहोचले आहे.

लोक कुठे जात होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी पाथर सेनी कुडा येथून बरगढ जिल्ह्यातील बनजीपल्लीकडे जात असलेल्या बोटीमध्ये सुमारे 50 लोक प्रवास करत होते. झारसुगुडा जिल्ह्यातील रेंगाली पोलीस ठाण्यांतर्गत बोट शारदा घाटात पोहोचत असताना हा अपघात झाला. स्थानिक मच्छिमारांनी 35 जणांची सुटका करुन त्यांना किनाऱ्यावर आणले.

अजून सात जण बेपत्ता आहेत

पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नंतर आणखी सात जणांना वाचवले असे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अजून सात जण बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली असून पाच गोताखोर घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT