Viral Video| BJP MP Janardan Mishra Dainik Gomantak
देश

Viral Video: भाजप खासदार जनार्दन यांनी चक्क शाळेतील शौचालयाची केली स्वच्छता

स्वतः खासदारानी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते अस्वच्छ शौचालय साफ करताना दिसत आहेत. स्वतः खासदारानी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर लोक कमेंटचा भडिमार करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खासदार जनार्दन मिश्रा (Janardan Mishra) पीएम मोदी (PM Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त मौगंज विधानसभा मतदारसंघातील हनुमाना येथील खातखरी युवा मंडळाकडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शाळेची पाहणी करताना शाळेतील स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी पाहता क्षणाचाही विलंब न करता शौचालय स्वच्छ करण्यास सुरूवात केली.

स्वच्छता करताचा हा व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, सध्या त्यांंचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. मिश्रा यांनी अशा प्रकारे शौचालय स्वतः स्वच्छ केल्याचा पहिल्यांदा घडलेले नसून, त्यांनी याआधीही अनेकदा शौचालये स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 2014 मध्ये मिश्रा यांना स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT