Chaiwala  Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh: भाजपचा 'चायवाला' उमेदवार करोडपती, प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा खुलासा

Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेश निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवाराची जोरदार चर्चा होत आहे.

दैनिक गोमन्तक

Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेश निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवाराची जोरदार चर्चा होत आहे. राजधानी शिमल्यात भाजपने एका चायवाल्याला तिकीट दिले आहे. तीन दशकांपासून चहाचा ठेला चालवणारे संजय सूद हे भाजपचे खूप जुने नेते आहेत. पक्षाने त्यांना यावेळी शिमला अर्बन मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. एकेकाळी खूप संघर्षातून गेलेले सूद आता करोडपती आहेत. नामांकनादरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सूद आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 2.7 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे.

दरम्यान, संजय सूद यांनी शुक्रवारी शिमला (Shimla) अर्बन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सूद हे सुरेश भारद्वाज यांची जागी यावेळी निवडणूक लढवणार आहेत. जे चार वेळा आमदार आणि जय राम ठाकूर (Jai Ram Thakur) सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

दुसरीकडे, संजय सूद (Sanjay Sood) यांच्याकडे 1.45 कोटी रुपयांची स्थावर आणि 54 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पत्नी सुनीता यांच्याकडे 46 लाख रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. त्यांनी मोठ्या संघर्षाने शिक्षण (Education) पूर्ण केले. सुरुवातीपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. सूद यांनी विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे.

तसेच, 1991 पासून सूद शिमला बस स्टँडवर चहाची टपरी चालवत आहेत. त्यांनी वृत्तपत्रेही विकली आहेत. अनेक दशके संघर्ष करणारे सूद आपल्या यशाबद्दल सांगतात की, हळूहळू आपल्याकडे पैसा जमा होत गेला. बचतीच्या पैशातून काही मालमत्ताही खरेदी केली, ज्याचे मूल्य आता वाढले आहे. TOI मधील एका वृत्तानुसार, सूद म्हणाले की, मी पोस्टाच्या बचत योजनेत दररोज 100 रुपये जमा करायचो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT