Bihar student protest firing video Dainik Goamantak
देश

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

Bihar Police AK47 Firing On Students Video: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 25 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या 'बिहार बंद'दरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

Bihar Police AK47 Firing On Students Video: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 25 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या 'बिहार बंद'दरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. सीवान जिल्ह्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट 'एके-47' या घातक रायफलीने अंधाधुंद गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या गंभीर घटनेची दखल घेत सीवानचे पोलीस अधीक्षक पूरन कुमार झा यांनी तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने निलंबित केले.

गोळीबार करणाऱ्या या कर्मचाऱ्याची ओळख एसआयटीमध्ये तैनात असलेला कॉन्स्टेबल अभिषेक पटेल म्हणून झाली असून त्याच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे बिहार पोलिसांवर सर्वस्तरातून टीका होत आहे.

25 जुलै रोजी राज्यव्यापी बंददरम्यान हजारो विद्यार्थी घोषणाबाजी करत आंदोलनासाठी गांधी मैदानाच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चकमक झाली. मात्र, सीवानमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दाखवत एसआयटीच्या जवानाने थेट 'एके-47'ने थेट गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. बिहार (Bihar) पोलीस मुख्यालयाने या व्हायरल व्हिडिओची स्वतःहून दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याची ओळख पटवून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कुऱ्हाड चालवली.

या घटनेनंतर बिहार आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन हा थरारक व्हिडिओ शेअर करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "निर्दोष विद्यार्थ्यांवर थेट एके-47 ने गोळ्या झाडल्या जात असून ही लोकशाहीची उघडपणे हत्या आहे," असा आरोप करत त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली. तर दुसरीकडे, संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांच्या या हिंसक पॅटर्नवर आक्षेप घेतला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून कायदा हातात घेण्याचे नाही, असा घणाघात त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT