Tejashwi Yadav Dainik Gomantak
देश

Tejashwi Yadav: तेजस्वी यादव यांनी सुप्रीम कोर्टात मागितली माफी; म्हणाले होते- ''केवळ गुजरातीच ठग असू शकतात''

Tejashwi Yadav Apologized In Supreme Court: गुजरातींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पकडले गेलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी माफी मागितली आहे.

Manish Jadhav

Tejashwi Yadav Apologized In Supreme Court: गुजरातींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पकडले गेलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी माफी मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी देशातील सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केल्याचे वृत्त आहे.

यापूर्वी, यादव यांनी हे प्रकरण गुजरातबाहेर नवी दिल्लीत स्थानांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. 'केवळ गुजरातीच ठग असू शकतात' या कथित टिप्पणीबद्दल तेजस्वी यादव यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला सुरु आहे. त्यांनी हे प्रकरण दिल्लीला वर्ग करण्याची विनंती केली आहे. न्यायमूर्ती ए एस ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने तेजस्वी यांनी दाखल केलेले ताजे माफीनामा निवेदनही रेकॉर्डवर घेतले.

दरम्यान, 29 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने यादव यांना 'केवळ गुजरातीच ठग असू शकतात' ही कथित टिप्पणी मागे घेत 'योग्य विधान' दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यादव यांनी 19 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन आपली कथित टिप्पणी मागे घेतली होती. तक्रारदाराने यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे, त्यानंतर न्यायालयाने तेजस्वी यादव यांना आठवडाभरात नवीन म्हणणे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना यापूर्वी फौजदारी मानहानीच्या तक्रारीवरील कारवाईला स्थगिती दिली होती आणि गुजरातचे रहिवासी हरेश मेहता यांना नोटीस बजावली होती. मेहता हे स्थानिक व्यापारी आणि कार्यकर्ते आहेत. तेजस्वी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत कथित गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, यादव यांनी मार्च 2023 मध्ये पाटणा येथे माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, 'सध्याच्या परिस्थितीत फक्त गुजरातीच फसवणूक करु शकतात आणि त्यांची फसवणूक माफ केली जाईल.' बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव पुढे म्हणाले होते की, 'एलआयसी किंवा बँकांचे पैसे घेऊन ते पळून गेले तर त्याला जबाबदार कोण?' यादव यांच्या वक्तव्यामुळे सर्व गुजरातींची बदनामी झाल्याचा दावा मेहता यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT