Crime News  Dainik Gomantak
देश

Bihar Crime: जवानाने पत्नीसह दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळले, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

Bihar Crime: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आर्मीच्या जवानाने पत्नी आणि दोन महिन्यांच्या बाळाला जिवंत जाळले.

Manish Jadhav

Bihar Crime: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आर्मीच्या जवानाने पत्नी आणि दोन महिन्यांच्या बाळाला जिवंत जाळले. बँकेत काम करणाऱ्या मुलीशी अवैध संबंध ठेवणाऱ्या जवानाने आपला सुखी संसार उद्ध्वस्त केला.

आरोपी जोधपूर येथे तैनात आहे. तो नुकताच रजेवर घरी आला होता. त्या घटनेनंतर त्याने पत्नी आणि दोन महिन्यांच्या तान्ह्या मुलाला जिवंत जाळले.

महिलेचा पती आणि सासरचे लोक फरार आहेत. हे प्रकरण अहियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा जगरनाथ गावाशी संबंधित आहे. हिमांशू कुमार असे आरोपी जवानाचे नाव आहे.

दरम्यान, या घटनेबाबत सांगितले जात आहे की, मंगळवारी आरोपी (Accused) जवान त्याच्या घरी आला होता. पत्नी असताना त्याला बँकेतील तरुणीशी लग्न करायचे होते.

यासाठी त्याने प्रेयसीला घरी बोलावले होते. दुसरीकडे, या गोष्टीला पत्नी सतत विरोध करत होती, त्यानंतर संतापलेल्या आरोपीने पत्नी आणि 2 महिन्यांच्या मुलाला जिवंत जाळले.

8 वर्षाच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न

आरोपी जवानाने आपल्या 8 वर्षाच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पळत सुटली आणि आजीचं घर गाठलं. जवानाच्या सासरचे घर त्याच्या घरापासून काही अंतरावर आहे. आजीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मुलीने तिचे वडील, आई आणि दोन महिन्यांचा लहान भाऊ भाजल्याचे सांगितले.

यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पळ काढत मुलीचे घर गाठले आणि ती जळालेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले, तसेच तिचा मुलगाही जळाला होता. यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही रुग्णालयात नेले असता दोघांचाही मृत्यू झाला. आठ वर्षांच्या मुलीलाही दुखापत झाली पण ती ठीक आहे.

बँकेत काम करणाऱ्या मुलीच्या अफेअरमध्ये होता

पीडितेच्या भावाने घटनेबाबत सांगितले की, बहीण सोनल प्रियाचा विवाह हिमांशूसोबत 2023 मध्ये झाला होता. लग्न झाले तेव्हा तो बेरोजगार होता, नंतर जेव्हा त्याला सैन्यात नोकरी लागली तेव्हा त्याने हुंडा म्हणून 10 लाख रुपये मागायला सुरुवात केली.

दुसरीकडे, बँकेत (Bank) काम करणाऱ्या तरुणीसोबत त्याचे दोन वर्षांपासून अवैध संबंध होते, त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, बहिणीने विरोध केल्यावर त्याने तिची हत्या केली. ही तरुणी देवरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. ती सुतापट्टी येथील बँकेत काम करते.

याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी अहियापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी डीएसपी राघव दयाल यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर आरोपींच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT