jamui bihar viral love story Dainik Gomantak
देश

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

jamui bihar viral love story: बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी प्रेम कहाणी समोर आली आहे, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Sameer Amunekar

बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी प्रेम कहाणी समोर आली आहे, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेमासाठी एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या आयुष्यात दोनदा धर्म बदलला आहे. ५ मुलांची आई असलेल्या या महिलेने आपल्या पहिल्या पतीला आणि मुलांना सोडून वयाने तब्बल २६ वर्षे लहान असलेल्या १९ वर्षांच्या प्रियकराशी मंदिरात हिंदू रीतीरिवाजांनुसार लग्न केले आहे.

हा अनोखा प्रकार जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडुई बरियारपूर गावात उघडकीस आला आहे. येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय महावीर ठाकूर या युवकाचे पूर्णिया येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय सीमा परवीनसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोघांची ओळख केवळ एका 'रॉन्ग नंबर'वर आलेल्या मिस्ड कॉलमुळे झाली होती. दोन वर्षे फोनवर सुरू असलेल्या संभाषणाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर हे प्रेम इतके वाढले की, सीमा कोलकाता येथे पोहोचली आणि दोघांनी तेथील एका मंदिरात विवाह केला. त्यांच्या विवाहाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

१० वर्षांपूर्वी हिंदूची झाली होती मुस्लिम या महिलेच्या आयुष्याची कहाणी अत्यंत गुंतागुंतीची आहे. १० वर्षांपूर्वी तिचे नाव 'बिंदू' होते आणि ती हिंदू होती. त्या काळात तिचे मनन आलम नावाच्या मुस्लिम युवकावर प्रेम जडले. मननशी निकाह करण्यासाठी तिने आपला धर्म बदलला आणि ती 'सीमा परवीन' बनली. या दोघांना पाच मुलेही झाली. मात्र, आता पुन्हा एकदा महावीरच्या प्रेमात पडल्यानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारला असून ती परत 'बिंदू' बनली आहे आणि तिने महावीरशी लग्न केले आहे.

पती-पत्नीचे एकमेकांवर गंभीर आरोप या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. बिंदू ऊर्फ सीमा परवीनचे म्हणणे आहे की, तिचा पहिला पती मनन आलम हा तिचा छळ करायचा. या त्रासाला कंटाळून तिने महावीरची साथ निवडली. दुसरीकडे, दिल्लीत काम करणाऱ्या मनन आलमने फोनवर सांगितले की, सीमाचे वर्तन आधीपासूनच ठीक नव्हते. मननने आरोप केला आहे की, तो जेव्हा दिल्लीत असायचा, तेव्हा सीमाचे त्याच्या लहान भावासोबतही अफेअर होते. आता ती घर सोडून पळून गेल्याने आपल्याला तिच्याशी काहीही देणेघेणे नाही आणि पाचही मुले आपल्याकडेच राहतील, असे मननने स्पष्ट केले.

ग्रामस्थांचा आक्षेप आणि पोलीस तपास

प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यात महावीर जेव्हा आपल्यापेक्षा २६ वर्षांनी मोठ्या असलेल्या नवविवाहित पत्नीला घेऊन गावात पोहोचला, तेव्हा गावकऱ्यांनी या सर्व प्रकाराला तीव्र आक्षेप घेतला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. खैरा पोलीस ठाण्याचे प्रभारी मिंटू कुमार सिंग यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या तक्रारीवरून दोन्ही पक्षांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते.

पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान दोघांनीही आपण सज्ञान (बालिग) असल्याचे सांगितले आणि एकमेकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. दरम्यान, या विवाहाची आणि पुन्हा झालेल्या धर्मपरिवर्तनाच्या दाव्यांची अद्याप कोणतीही अधिकृत किंवा स्वतंत्र पुष्टी झालेली नाही, मात्र या अजब प्रेम कहाणीची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

जंतरमंतरवर सरकारविरोधात तरुणाई, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT