Darjeeling Tourist Place Dainik Gomantak
देश

वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असलेल्या दार्जिलिंगला लसीकरणाची गरज

दैनिक गोमन्तक

दार्जिलिंगच्या व्यापाऱ्यांनी (Darjeeling Traders) पर्यटकांच्या आगमनास प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांना कोविड -19 (COVID-19) विरोधात लसीकरणाची मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रसिद्ध डोंगराळ पर्यटन स्थळ असलेल्या दार्जिलिंगला कोविड -19 या साथीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बाजारपेठेत शांतता आहे. पर्यटन उद्योगाशी संबंधित लोक कठीण काळातून जात आहेत. “लॉकडाउनमुळे मध्यमवर्गीय आणि निम्न आर्थिक वर्गाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. संपूर्ण दार्जिलिंग पर्यटकांवर अवलंबून आहे मात्र कोरोना वाढल्याने पर्यटकच येत नाही, असे तेथिल हॉटेल व्यवस्थापकांनी सांगितले. (Big crisis for Darjeeling traders due to non arrival of tourists due to corona)

पर्यटक येत नसल्याने स्थानिकांचे हाल

दार्जिलिंगमध्ये दुकाने आणि रेस्टॉरंट्स खुली असल्याचे दिसत आहे, परंतु कोरोनाचा या व्यवसायांवर खोल परिणाम झाला आहे. आणि पर्यटक येत नसल्याने तर स्थानिकांचे हाल होत आहे असे म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीत सरकारने या भागात जास्तीत जास्त लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देणे गरजेच आहे.

दुकानांमध्ये काही मोजके ग्राहक येत आहेत, कर्मचार्‍यांना पैसे देण्यासाठी काहींनी तर कर्ज घेतले आहे, अशा परिस्थितीत तेथिल स्थानिकांचे जगणे शक्य नाही. लसीकरणामुळे कोविडची प्रकरणे कमी होण्यास मदत होवू शकते. म्हणूनच लोकांना लस मिळायला हवी ज्यामुळे त्यांचे आयुष्यच सेफ होणार नाही तर दार्जिलिंगचे पर्यटन सुधारण्यासही मदत होईल. म्हणून जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन स्थानिक शासनाला करत आहे.

सरकारने थोडी सवलत दिली आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा जिवनमान पुर्वव्रत आणण्याचा प्रयत्न केला. आणि निर्बंधात थोडी शिथिलता दिली आहे. त्याचबरोबर सरकारने राज्यभरातील निर्बंधांना 15 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने इतर सेवांसह खासगी व राज्य वाहनांना 50 टक्क्यांच्या क्षमतेसह चालविण्यास परवानगी दिली आहे, परंतु सर्व वाहनचालकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. पर्यटक दार्जिलिंगला जाऊ शकतात, परंतु आरटीपीसीआर चाचणी अहवाल 72 तासापेक्षा जास्त जुना नसावा, त्याचबरोबर सरकारकडूनही त्याला परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. दार्जिलिंगमध्ये 500 हॉटेल्स आहेत, 2018-19 मध्ये सुमारे 7.5 लाख देशी आणि 40,000 आंतरराष्ट्रीय पर्यटक दार्जिलिंगला भेट देण्यासाठी आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT