Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

Yogi Adityanath: सीएम योगींची मोठी घोषणा, जिल्ह्यांमध्ये मिळणार मोफत डायलिसिस सुविधा

दैनिक गोमन्तक

CM Yogi Adityanath: सीएम योगींनी जनतेला आणखी एक मोठी भेट दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत 48 तासांच्या मोफत उपचारानंतर आता यूपी सरकार मोफत डायलिसिसची सुविधा देणार आहे. घोषणा करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'किडनीशी संबंधित आजारांवर उपचार करण्यात डायलिसिस महत्त्वाची भूमिका बजावते. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत, आम्ही आधीच 65 जिल्ह्यांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. आणखी तीन जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरु झाल्यानंतर आता ही सुविधा 68 जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जीवनमानाची हमी मिळावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.'

दरम्यान, चांदौली, भदोही आणि हाथरस येथील डायलिसिस केंद्रे आणि 35 जिल्ह्यांतील अपग्रेडेड एएनएम केंद्रांवर कालिदास मार्गावरील सरकारी निवासस्थानातून बुधवारी शैक्षणिक सत्राचे उद्घाटन करताना योगी म्हणाले की, 'मूत्रपिंडाचा आजार टाळायचा असेल, तर साखरेपासून दूर राहावे लागेल. यासाठी आपल्याला तणाव टाळावा लागेल.' आरोग्य, कल्याण केंद्रांवर तोंडाच्या कर्करोगाची तपासणी मोहीम देखील सुरु केली आहे. ते पुढे म्हणाले की, 'आज एकाच वेळी 35 एएनएम केंद्र सुरु करण्यात आले आहेत. ही सर्व केंद्रे उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहेत. यामध्ये पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि कर्मचारी अशा आधुनिक सुविधा आहेत.'

दुसरीकडे, ते सुरु झाल्यास एकाच वेळी 1700 हून अधिक मुलींना प्रशिक्षण दिले जाईल. इथे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या कोणत्याही मुलींना आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्री पुढे असेही म्हणाले की, 'पॅरामेडिकल कर्मचारी हा कोणत्याही राज्यातील आरोग्य सुविधेचा कणा असतो. एएनएमची भूमिका काय असू शकते याची प्रचिती कोरोना महामारीममध्ये (Corona Epidemic) आली.

पायाभूत सुविधांनंतरही एएनएम केंद्रे बंद होती

योगी म्हणाले की, '33 वर्षांपूर्वी राज्यात पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या, मात्र ही एएनएम केंद्रे बंद होती. त्यामुळे राज्यातील मुलींना नर्सिंगच्या शिक्षणासाठी खासगी केंद्रात प्रवेश घ्यावा लागला किंवा इतर शहरात जावे लागले. पुढील शैक्षणिक सत्रात एएनएम केंद्रांमध्ये गुणवत्तेसह प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरु करावी, अशा सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल.'

तुम्ही किडनी तज्ज्ञ नसल्यास डॉक्टरांना प्रशिक्षण द्या

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सर्व 75 जिल्ह्यांमध्ये नेफ्रोलॉजिस्ट किंवा किडनी तज्ज्ञ उपलब्ध नसण्याची शक्यता आहे, परंतु डॉक्टर सर्वत्र आहेत. या डॉक्टरांना (Doctors) प्रशिक्षित केले जाऊ शकते. तंत्रज्ञ देखील तैनात केले जाऊ शकतात. यासोबतच पीपीपी मॉडेलवर डायलिसिस सेंटरही चालवता येऊ शकते, त्यासाठी केंद्र सरकारला या कामात मदत करायची आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये मोफत डायलिसिस उपलब्ध करुन देण्यासाठी आपण वेगाने काम केले पाहिजे.' मुखाच्या कर्करोगाबाबत (Cancer) संपूर्ण राज्यात मोहीम सुरु असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT