Bengaluru Traffic  Dainik Gomantak
देश

Bengaluru: उपराष्ट्रपतींच्या बंगळुरु दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून वाहतूक नियमावली जारी; पाहा डिटेल्स

Bengaluru Traffic: याच पाश्वभूमीवर कर्नाटकची राजधानी आणि हायटेक सिटी बंगळुरुमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. बंगळुरु पोलिंनी वाहतूक नियमावली जारी केली आहे.

Manish Jadhav

Bengaluru Traffic Advisory Issued Ahead Of Vice Presidents Visit: देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर शुक्रवारी दक्षिणेकडील तीन राज्यांच्या एक दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. याच पाश्वभूमीवर कर्नाटकची राजधानी आणि हायटेक सिटी बंगळुरुमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. बंगळुरु पोलिसांनी वाहतूक नियमावलीही जारी केली आहे. शहरांमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी बंगळुरु वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेत वाहतुकीसाठी विशेष मार्गिका जाहीर केली आहे.

नियोजित भेटीदरम्यान प्रवाशांना खालील रस्त्यांनी जाणे टाळावे

वरथूर रोड (सुरंजनदास रोड जंक्शन ते मराठहल्ली ब्रिज)

आऊटर रिंग रोड (कार्तिकनगर जंक्शन ते मराठहल्ली ब्रिज)

दोडनाकुंडी मेन रोड (वरथूर रोड ते दोडनाकुंडी ISRO)

बसवंगार मुख्य रस्ता

यमलूर मेन रोड

सुरंजनदास रोड

जुना विमानतळ रस्ता

खालील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगला सक्त मनाई:

वरथूर रोड (सुरंजनदास रोड जंक्शन येथील मराठहल्ली पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू)

होरावर्तुला रोड (कार्तिकनगर जंक्शन येथील मराठहल्ली पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू)

दोडनाकुंडी मेन रोड (वरथूर रोड ते दोडनाकुंडी ISRO या रस्त्याच्या दोन्ही बाजू)

अधिकृत निवेदनानुसार, उपराष्ट्रपती जगदीप धनखर शुक्रवारी दक्षिणेकडील तीन राज्यांच्या एक दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा बंगळुरु येथील ISRO संस्थेला भेट देऊन सुरु होणार आहे, जिथे ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या वैज्ञानिक समुदायाशी संवाद साधतील. यानंतर ते केरळच्या तिरुवनंतपुरम येथे राजनका पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात महाशिवरात्री सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

दुसरीकडे, व्हीव्हीआयपी भेटीदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रहदारीतील व्यत्यय कमी करण्यासाठी बंगळुरु वाहतूक पोलिसांनी शहरवासींयासाठी अॅडवायझरी जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT