School  Dainik Gomantak
देश

दोन हजारांसाठी शिक्षकाने विवस्त्र होण्यास भाग पाडले; विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

Karnataka Crime: कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका विद्यार्थिनीवर चोरीचा आरोप करुन तिला तिचे कपडे उतरवण्यास भाग पाडले.

Manish Jadhav

Karnataka Crime:

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका विद्यार्थिनीवर चोरीचा आरोप करुन तिला तिचे कपडे उतरवण्यास भाग पाडले. या घटनेनंतर विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला. दोन दिवसांनी तिने आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शाळेतून शिक्षकाच्या पर्समधून दोन हजार रुपये गायब झाले होते. पीडितेनेच ही चोरी केल्याचा संशय शिक्षकाला होता. त्याच्यावर जबरदस्तीने कपडे उतरवल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विद्यार्थीनी गप्प-गप्प राहू लागली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

कुटुंबीयांचा आरोप - विद्यार्थिनीला तिचे कपडे काढायला लावले

कुटुंबीयांचा आरोप आहे की, विद्यार्थिनीचे केवळ कपडेच काढले नाहीत तर तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मंदिरात नेण्यात आले. ही घटना ज्या शाळेत घडली त्याच शाळेत विद्यार्थिनीची मोठी बहीणही शिकते. विद्यार्थिनीच्या मोठ्या बहिणीकडून त्यांना सर्व काही कळले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शाळा प्रशासनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेला शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकही (Teacher) जबाबदार आहेत.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला

बागलकोटचे एसपी अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत विद्यार्थिनी अतिशय संवेदनशील होती. दोन दिवसांपासून ती कोणाशीही बोलत नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मुलीचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेवर शाळा प्रशासनाने मौन बाळगले आहे. या घटनेवर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. विद्यार्थिनीच्या मैत्रीणींचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT