Bengaluru Crime News about 20-year-old woman's death Dainik Gomantak
देश

Bengaluru Crime: रात्रभर शोधलं, पण सकाळी थेट मृतदेहच सापडला! बॉयफ्रेंडला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून 20 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन; बंगळुरुत खळबळ

Bengaluru Crime News: बंगळुरुमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Bengaluru Crime News: बंगळुरुमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. येथील सदाशिव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध 'सँकी तलावातून' (Sankey Tank) एका 20 वर्षीय तरुण विद्यार्थिनीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला.

मृत विद्यार्थिनीची ओळख पटली असून, ती चिक्कबानवारा येथील राहणारी असून तिचे नाव 'तेजू' असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून आणि तपासाच्या चक्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आत्महत्येपूर्वी तेजूने कथितपणे तिच्या प्रियकराला एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये तिने आपले जीवन संपवण्याबाबत म्हणजेच आत्महत्या करण्याबाबत स्पष्टपणे लिहिले होते. एवढेच नाही तर, हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी तिने आपल्या आईच्या मोबाईलवरही एक भावनिक मेसेज पाठवला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तलावाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, तेजू त्या तलावाजवळ कोणाच्याही सोबतीशिवाय अगदी एकटीच चालत आली असल्याचे निष्पन्न झाले. तलावाच्या सुरक्षारक्षकाने (गार्ड) आज सकाळी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला आणि तातडीने स्थानिक पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजू काल संध्याकाळी घरात कोणालाही, विशेषतः तिच्या आईला काहीही न सांगता अचानक निघून गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी रात्रभर तिचा सर्वत्र शोध घेतला. या शोधमोहिमेत स्थानिक पोलिसांनीही कुटुंबाला मदत केली होती. मात्र, आज सकाळी सँकी तलावात तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना तिची ओळख पटवण्यात यश आले. पोलीस तपासात आणखी एक महत्त्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी समोर आली, ती म्हणजे तेजूचे माता-पिता गेल्या काही काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. या कौटुंबिक वादामुळे किंवा मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलले का, याचा शोध पोलीस घेत असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT