Bengaluru
Bengaluru Dainik Gomantak
देश

Bengaluru: भयानक, लग्नाला नकार म्हणून गर्लफ्रेंडचा विषयच संपवला! हादरवणारी घटना

दैनिक गोमन्तक

बंगळुरू शहरातील एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर चाकूने 16 वार केले. तसेच तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बंगळुरू शहर हादरले आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

बेंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले की, तरुणीचे नाव लीला पवित्रा नीलमणी असून ती 25 वर्षाची हेती. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील रहिवासी आहे तर आरोपी प्रियकराचे नाव वर्षीय दिनकर जो की 28 वर्षाचा आहे. प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिची 15 हून अधिक वार करून हत्या केली.

मुलीने लग्नास नकार का दिला

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची आणि तिच्या प्रियकराची जात वेगळी होती. भिन्न जातीतील असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. डीसीपीने सांगितले की, 28 वर्षीय आरोपी प्रियकराने मंगळवारी संध्याकाळी पूर्व बंगळुरूमधील मुरुगेशपल्या येथे तिच्या कार्यालयाबाहेर चाकूने 15 पेक्षा जास्त वार केले.

पोलिसांनी सांगितले की, मुलगी मुरुगेशपल्यातील ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते. त्याचवेळी आरोपी दिनकर बनाला हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील एका आरोग्य सेवा कंपनीत कर्मचारी आहे. लीला जेबी नगर येथील पीजीमध्ये राहत होती, तर दिनाकर डोमलूर येथे राहत होता.

  • गेल्या 5 वर्षांपासून दोघांचे अफेअर सुरू होते

डीसीपी भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडली. दिनकर आणि लीला हे गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

दिनकर आणि लीला यांची पहिली भेट एका हेल्थकेअर फर्ममध्ये झाली. दोघेही इथे एकत्र काम करायचे. काही महिने भेटल्यानंतर आणि बोलल्यानंतर दोघेही प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते.

लीला दिनकरला सांगितले की तिचे कुटुंब लग्नासाठी सहमत होणार नाही आणि ती तिच्या कुटुंबाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही. यामुळे आरोपी संतापला. मंगळवारी संध्याकाळी आरोपी दिनकर तिच्या कार्यालयाबाहेर पोहोचला आणि बाहेर तिची वाट पाहू लागला. संध्याकाळी लीला ऑफिसमधून निघाली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, आरोपीने धारदार चाकूने प्रेयसीवर चाकुने वार केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT