Bengaluru Seized 9 Crore Cash Dainik Gomantak
देश

Bengaluru 9 Crore Cash Seized: बंगळुरुमध्ये 'क्रेटा'मधून 9 कोटींची रोकड जप्त; आयकर विभाग आणि पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ!

Bengaluru Car Cash Seizure 9 Crore: बंगळुरु येथे आयकर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत एका हुंडाई क्रेटा कारमधून तब्बल 9 कोटींची बेनामी रोकड जप्त केली.

Manish Jadhav

Bengaluru Car Cash Seizure 9 Crore: बंगळुरुमध्ये आयकर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत एका हुंडाई क्रेटा कारमधून तब्बल 9 कोटींची बेनामी रोकड जप्त केली. 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेले सूटकेस कारच्या डिग्गीत लपवून नेली जात असताना इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने ही धडक कारवाई केली. कारमधील दोन्ही संशयित तरुण एवढ्या मोठ्या रकमेचा कोणताही वैध हिशोब किंवा स्रोत सांगू न शकल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून आयकर विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली.

दरम्यान, ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून पोलीस तपास आणि संशयितांच्या चौकशीनंतर आज (22 ऑगस्ट) अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाचे उपसंचालक जगदीश यांना एका हुंडाई क्रेटा कारमधून (KL 20 T 8629) मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम बंगळुरुवरुन तमिळनाडूतील होसूरच्या दिशेने बेकायदेशीरपणे नेली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलीस ठाण्याच्या पथकाने होसूर रोडवरील एक्सप्रेसवे टोल प्लाझानंतर सापळा रचून रात्री 10:30 वाजता ही कार अडवली.

कारची तपासणी केली असता त्यात 500 रुपयांच्या नोटांनी भरलेले सूटकेस आढळली, ज्यात तब्बल 9 कोटी रुपये होते. कारमधील एका संशयिताची ओळख तमिळनाडूच्या थुथुकुडी येथील 'सिंधु ज्वेलर्स'शी संबंधित असलेल्या 42 वर्षीय सचिन म्हणून झाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन आयकर विभागाच्या हवाली केले. या कारवाईनंतर आयकर विभागाने (Income Tax Department) तमिळनाडूमधील संशयितांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले असता, तेथून आणखी 1.3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या काळ्या पैशाचा मुख्य स्रोत काय आहे आणि ही रक्कम कुठे पोहोचवली जाणार होती, याचा शोध आता आयकर विभाग घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sexual Assault Case: सोहम नाईक कोलवाळ तुरुंगातून पडला बाहेर; पाचपैकी चार प्रकरणांत जामीन

Bendurde Pole Four Lane Road: महामार्गाला अडथळा, 1500 झाडे हटवणार; बेंदूर्डे-पोळे चारपदरी महामार्गाचे काम ऑक्टोबरपासून

Goa University: नवे नेतृत्व, नव्या आकांक्षा अन् नव्या दिशा! गोवा विद्यापीठाला मिळणार गोमंतकीय कुलगुरु; शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची नवी संधी

फायनलमधील राडा भोवला! FIFAची मोठी ॲक्शन, 4 खेळाडूंवर निलंबनाची कारवाई; अर्जेंटिनाच्या स्टारवर 10 सामन्यांची बंदी

Vashi Island: मांडवीच्या कुशीत दडलेले वाशी बेट! समुद्राच्या लाटांपासून हिरव्यागार वनराईपर्यंत निसर्गाचे प्रत्येक रूप येथे अनुभवता येते

SCROLL FOR NEXT