Bank Holiday Dainik Gomantak
देश

Bank Holidays in October: ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद

दसरा, दिवाळीच्या सुट्टयांमुळे कामकाज राहणार बंद; महत्वाची कामे घ्या करून

गोमन्तक डिजिटल टीम

Bank Holidays in October: बँक ही लोकांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग बनली आहे. त्यामुळे जेव्हा बँका दीर्घकाळ बंद असतात तेव्हा सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा तोंड द्यावे लागते. ऑक्टोबर महिन्यात विविध सण-उत्सव आणि सरकारी सुट्ट्या पाहता जवळपास 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नंतर अडचण होऊ नये, यासाठी नागरिकांनी बँकांची महत्वाची कामे करायची करून घ्यावीत.

प्रत्येक राज्यात तेथील स्थानिक सण उत्सवांनुसार सुट्ट्यांची यादी वेगवेगळी असते. या महिन्यात दसरा, दिवाळी असे मोठे सण आहेत. देशातील सर्व राज्यांचा विचार केला तर देशभरात ऑक्टोबरमध्ये एकूण 21 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

अर्थात एखाद्या राज्यातील स्थानिक सण-उत्सवाची सुट्टी दुसऱ्या राज्यात लागू असेलच असे नाही. उदाहरणार्थ दुर्गा पुजा उत्सवात बंगालमध्ये मोठी सुट्टी असते. तर छठ निमित्त बिहार आणि झारखंडमध्ये सुट्टी असते. पण या सर्व सुट्ट्या इतर राज्यांमध्ये नसतात. त्यामुळे केवळ कॉमन सुट्टया लक्षात घेऊन आम्ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी देत आहोत.

ऑक्टोबर महिन्यातील बँक हॉलिडेज

2 ऑक्टोबर - रविवार, गांधी जयंती

5 ऑक्टोबर - दसरा

8 ऑक्टोबर - दूसरा शनिवार

9 ऑक्टोबर – रविवार

16 ऑक्टोबर – रविवार

22 ऑक्टोबर – चौथा शनिवार

23 ऑक्टोबर – रविवार

24 ऑक्टोबर – दीपावली/नरक चतुर्दशी

26 ऑक्टोबर - दीपावली पाडवा/भाऊबीज

30 ऑक्टोबर – रविवार

ऑनलाईन सेवांचा करा वापर

ऑक्टोबर महिन्यात बँकांच्या सुट्टयांचा कालावधी जास्त असला तरी ग्राहकांना बँकांच्या ऑनलाईन सेवांचा कधीही कुठेही 24 तास वापर करता येऊ शकतो. ऑनलाईन सेवांमुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मोबाईल आणि नेट बँकिंगद्वारेही महत्वाची कामे ग्राहक सहज करू शकतात. शिवाय रोकड काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड्सच्या वापरासह युपीआय या माध्यमातूनी पैसे पाठवता किंवा स्विकारता येऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT