Azam Khan Dainik Gomantak
देश

Azam Khan: आझम खान यांना मोठा झटका, SC ने फेटाळली 'ही' मागणी

Fake Certificate Case: या याचिकेत आझम खान यांनी उत्तर प्रदेशात न्याय मिळणार नसल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमन्तक

Azam Khan In Supreme Court: बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी मुलगा अब्दुल्ला आझम यांच्याविरुद्धचा खटला उत्तर प्रदेश (यूपी) बाहेर वर्ग करण्याची आझम खान यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत आझम खान यांनी उत्तर प्रदेशात न्याय मिळणार नसल्याचे म्हटले होते.

सुनावणीस नकार

आझम खान यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) हस्तक्षेपाचे कोणतेही कारण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही उच्च न्यायालयात (HC) जाऊ शकता.' यासोबतच त्यांच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर आता दोघांना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.

कायदेशीर अडचणी कमी होत नाहीत

आझम खान यांचा कायदेशीर त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. तत्पूर्वी, द्वेषपूर्ण भाषण दिल्याच्या आरोपावरुन सपा नेते आझम खान यांच्याविरुद्ध शहजादनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी मंगळवारी न्यायालयात झाली. या प्रकरणाचे साक्षीदार निरीक्षक अनुराग चौधरी यांनी त्यांचे म्हणणे नोंदवले. त्यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात त्यांच्यावर घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांवर आणि अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फैसल खान लाला यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT