Azadi Ka Amrit Mahotsav Dainik Gomantak
देश

Azadi Ka Amrit Mahotsav: केंद्राचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनावरून देशभरामध्ये 'हर घर तिरंगा' उत्सव सुरू झाला असून तो 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Azadi Ka Amrit Mahotsav Central Government big decision Free entry to monuments museums till August 15)

या पर्वामध्ये आता केंद्र सरकारने (Central Government) लोकांना स्वातंत्र्याच्या या सणाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढविण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे पर्यटकांना सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये इ.मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

ASI च्या मेमोरियल-2 चे संचालक डॉ. एन.के. पाठक यांच्या वतीने बुधवारी आदेश जारी करण्यात आला आहे की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पाहुण्यांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत तसेच या साइट्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. तसेच याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT