Ram Mandir in Ayodhya  Dainik Gomantak
देश

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, ‘या’ जिहादी गटाने मंदिर उडवण्याची दिली धमकी

जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Ayodhya Temple : उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. राम मंदिर कधी उघडणार याची तारीख देखील काल गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली.

आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. या नियतकालिकाच्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचेही म्हटलं आहे.

तसेच यातून भारतीय मुस्लिमांना असे सांगितले आहे की,  त्यांनी "या कारणामुळे भौतिक हानीची भीती बाळगू नये", कारण त्यांनी आधीच अनेक दशकांपासून जीवन आणि मालमत्तेचा नाश सहन केला आहे. या जीवाचा आणि मालमत्तेचा वापर जिहादसाठी केला असता तर एवढी हानी झाली नसती". भारतीय मुस्लिमांसाठी धर्मनिरपेक्षतेला मानू नये. धर्मनिरपेक्षता हा  "नरक" आहे आणि हिंदू-मुस्लिम बंधुत्वाच्या घोषणा ही "फसवणूक" आहे.

त्यात पुढे असेही म्हटले आहे की, "जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगढ, जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) आणि देवबंद (शहर) पर्यंत हिंदू प्रत्येकासाठी चाकू, भाले आणि तलवारी धारदार करत आहेत. सर्व हिंदूंना काठ्या वापरायला शिकवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT