Autorickshaw
Autorickshaw Dainik Gomantak
देश

Karnataka Autorickshaw Blast: मंगळुरु ऑटोरिक्षा बॉम्बस्फोटप्रकरणी मोठा खुलासा, DGP म्हणाले...

दैनिक गोमन्तक

Autorickshaw Blast in Karnataka Mangaluru: कर्नाटकातील मंगळुरुमध्ये शनिवारी एका चालत्या ऑटो रिक्षात स्फोट झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. डीजीपी कर्नाटक यांनी रविवारी सकाळी या संदर्भात सांगितले की, 'हा स्फोट अपघाती नसून, मोठे नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेले दहशतवादी कृत्य आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय एजन्सींसोबत याची कसून चौकशी करत आहेत.'

काय झालं

कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरु येथे शनिवारी एका चालत्या ऑटोरिक्षात अचानक स्फोट होऊन आग लागली. आग लागल्यानंतर ऑटोचालक आणि रिक्षात बसलेला प्रवासी जळून खाक झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी शेअर केलेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, किरकोळ स्फोटानंतर ऑटोरिक्षाला अचानक आग लागल्याचे दिसून येते. स्फोटानंतर कर्नाटक पोलिसांनी (Police) या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे.

पोलिसांनी शनिवारी स्फोटाचा इन्कार केला होता

शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेतील स्फोटाला दुजोरा दिला नाही. शहराचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार शनिवारी घटनास्थळी पोहोचले होते. तपासानंतर त्यांनी सांगितले की, 'ऑटो रिक्षा पूर्णपणे पेटली होती. परंतु घाबरण्याची काही एक गरज नाही. पोलीस पथक लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार आहे.'

घटनेच्या तपासासाठी पथक गठित केले

एन. शशी कुमार पुढे म्हणाले की, 'आम्ही या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी विशेष टीम आणि एफएसएल (Forensic Science Lab) टीमला पाचारण केले आहे.' या घटनेची माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की, 'अपघातानंतर काही लोक जखमी झाले आहेत. या लोकांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT