Arvind Kejriwal News, Attack on Arvind Kejriwal's House Dainik Gomantak
देश

Delhi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर आंदोलकांनी येथे गोंधळ घातला. सीसीटीव्ही फोडण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. (Attack on Arvind Kejriwal's House)

सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) आणि सुरक्षा भिंती तोडल्या आहेत. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तुटले आहेत. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर भाजप पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारात आणले, असेही ते म्हणाले.

50 कामगार ताब्यात असताना, दिल्ली (Delhi) उत्तर डीसीपीने सांगितले की भाजप युवा मोर्चाचा निषेध सुरू होता, ज्यामध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला, सीसीटीव्हीवरही हल्ला केला, मुख्यमंत्र्यांच्या (CM Arvind Kejariwal) निवासस्थानाबाहेर पेंट फेकले. यांच्यावर कारवाई करून आम्ही 50 जणांना ताब्यात घेतले आहे. या ठीकाणी गर्दी झाली होती ती आता पूर्ण शांत झाली आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT