Man Stabbed Himself in the Chest Dainik Gomantak
देश

धक्कादायक ! होळीच्या पार्टीत तरुणाने स्वत:च्याच छातीत खुपसला चाकू

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh Crime News : होळी हा सर्वांचाच आवडता सण आहे. रंगांची उधळण करत सर्वजण आनंदाने होळी साजरी करतात. पण हलीकडे मद्य किंवा भांग पिऊन होळी साजरी करण्याची जणू प्रथाच पडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्य पिऊन होळीच्या पार्टीमध्ये नाचणाऱ्या तरुणाबाबत एक अपघात घडला आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील एक तरुण मद्याधुंद अवस्थेत होळी (Holi) साजरी करत होता, मात्र त्याला याची किंमत मोजावी लागली आहे. पार्टीमध्ये नाचताना या तरुणाने स्वत:लाच इजा करून घेतली आहे. होळी खेळण्याच्या नादात तल्लीन होऊन त्याने स्वतःच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरुवातीला नाचता नाचता अचानक त्याने हातात चाकू घेतला आणि स्वतःच्याच छातीवर वार करण्याची अॅक्टिंग करु लागला. पण तो चाकू तरुणाच्या छातीत आरपार गेला आणि तो तरुण गंभीर जखमी झाला. क्षणार्धातच तो रक्तबंबाळ झाला. उपस्थितांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT