Astronomer CEO Viral Video Dainik Gomantak
देश

Astronomer CEO Viral Video: सीईओ-एचआर हेडचं अफेअर उघड! कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये तिला मिठी मारली नंतर... पाहा व्हिडिओ

Coldplay Viral Video: जगप्रसिद्ध हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या बोस्टन येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Sameer Amunekar

Astronomer CEO Andy Byron viral Coldplay Concert video

जगप्रसिद्ध हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या बोस्टन येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या कॉन्सर्टमधील एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही क्षणांतच तो व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. कारणही तसंच होतं – हा क्षण होता एका प्रसिद्ध कंपनीच्या सीईओ आणि त्याच्या एचआर हेडच्या गुप्त नात्याचा पर्दाफाश करणारा होता.

अ‍ॅस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्याच कंपनीतील एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट हे कोल्डप्लेच्या म्युझिक कॉन्सर्टला एकत्र आले होते. सुरुवातीला हे दोघं गर्दीत अन्य चाहत्यांप्रमाणे आनंद घेताना दिसत होते.

पण, कोल्डप्लेचा फ्रंटमन ख्रिस मार्टिनने स्टेजवरून ‘किस कॅम’ वापरून प्रेक्षकांमधील रोमँटिक जोडप्यांना स्क्रीनवर दाखवण्याचा खेळ सुरु केला आणि याच वेळी बायरन आणि कॅबोट यांच्यावर स्पॉटलाइट पडला.

गर्दीत एकमेकांना मिठी मारून नाचणाऱ्या या दोघांचा चेहरा किस कॅममुळे स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर झळकला. काही क्षण ते दोघं तेव्हा उत्साहात दिसले, पण अचानक त्यांना हे लक्षात आलं की संपूर्ण स्टेडियम आणि त्याबरोबरच सोशल मीडियावर त्यांचं ‘रोमँटिक कनेक्शन’ उघड झालंय.

त्यांनी पटकन चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत प्रेक्षकांपैकी अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये टिपला होता. काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अँडी बायरन – क्रिस्टिन कॅबोट हे नातं चर्चेचा विषय बनलं.

विशेष म्हणजे, अ‍ॅस्ट्रोनॉमर ही कंपनी कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठं नाव असून, बायरन आणि कॅबोट यांचं नातं आतापर्यंत कंपनीत किंवा व्यावसायिक वर्तुळात कुणालाही माहीत नव्हतं. पण, कोल्डप्लेच्या या म्युझिकल रात्रीने त्यांचं हे अफेअर अगदी थेट जगासमोर आणलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT