Assam Train Accident Kolkata Sairang Express: आसाममधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत असून, बुधवारी (11 नोव्हेंबर) सकाळी गुवाहाटीजवळील दिगारु भागात भीषण रेल्वे अपघात घडला. मिझोरमवरुन कोलकाताच्या दिशेने जाणाऱ्या कोलकाता-सैरांग एक्सप्रेसचे तब्बल सात डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा आणि रेल्वेचे आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु असून, जखमी प्रवाशांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हा अपघात (Accident) नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कोणत्या कारणास्तव घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून, अपघाताबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल. मिझोरम ते कोलकाता प्रवास करणाऱ्या या गाडीत किती प्रवासी होते आणि किती जण गंभीर जखमी आहेत, याचा अंदाज घेतला जात आहे. अलीकडच्या काळात देश-विदेशात घडलेल्या रेल्वे अपघातांच्या मालिकेत या घटनेची भर पडल्याने प्रवाशांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच स्पेनमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात दोन हाय-स्पीड गाड्यांची टक्कर होऊन तब्बल 69 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, 8 नोव्हेंबर रोजी इजिप्तची राजधानी कैरो येथेही दोन प्रवासी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन चार जण दगावले होते आणि 88 जण जखमी झाले होते. एकामागून एक घडणाऱ्या अशा रेल्वे दुर्घटनांमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आसाममधील या अपघाताबाबत रेल्वे मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाकडून नेमकी काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.