Arrested Dainik Gomantak
देश

तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहलेल्या 14 लोकांना आसाम पोलिसांनी केली अटक

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून अटकसत्र सुरु होते.

दैनिक गोमन्तक

तालिबानच्या (Taliban) समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट लिहिल्याबद्दल 14 लोकांना आसामच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून अटकसत्र सुरु होते. सर्व आरोपींवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष डीजीपी जीपी सिंह म्हणाले की, आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टसाठी 14 जणांना अटक केली आहे. सिंग पुढे म्हणाले की, या सर्वांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट इत्यादींसंबंधी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

आसाम पोलिसांची नजर भडकाऊ पोस्टवर

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस सतर्क आहेत आणि प्रक्षोभक पोस्टसाठी सोशल मीडियावर बारीक नजर ठेवून आहेत. कामरुप महानगर, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, दरंग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक व्हायोलेट बरुआ म्हणाले की, आसाम पोलीस सोशल मीडियावरील तालिबान समर्थक टिप्पणीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहे कारण ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे पाकिस्तान खूश

काबूलसह अफगाणिस्तानचे अनेक भाग तालिबानच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. तालिबान नंतर, जर कोणी यात सर्वात आनंदी असेल तर ते पाकिस्तान आहे. म्हणूनच इम्रान खान यांनी अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाची तुलना गुलामगिरीच्या साखळी तोडण्याशी केली.

चीन आणि पाकिस्तान तालिबानचा भारताविरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करतील. अफगाणिस्तानातील भारताच्या विकास प्रकल्पांना अडथळा आणणे आणि काश्मीरच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या प्रॉक्सी वॉरचा भाग बनणे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तान आता चीन-पाकिस्तानसाठी खुले मैदान आहे. जिथे तो मुक्तपणे खेळू शकतो, त्यामुळे भारतही या त्रिकुटाच्या समन्वयावर लक्ष ठेवून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT