Asia Cup 2025 India vs Pakistan Dainik Gomantak
देश

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

Asia Cup 2025 India vs Pakistan: आशिया कपच्या सहाव्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला.

Sameer Amunekar

Asia Cup 2025 India vs Pakistan

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणखी दोन मोठ्या सामन्यांची शक्यता निर्माण झाली आहे. सहाव्या सामन्यात पाकिस्तानला ७ विकेटने पराभूत करून भारताने सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने सुपर फोर फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. आता या दोन्ही संघांची गाठ सुपर फोर तसेच अंतिम सामन्यात पडू शकते.

भारताचा शेवटचा लीग सामना १० सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे ओमानविरुद्ध होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला आणि पाकिस्तानने यूएईला पराभूत केले, तर २१ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सुपर फोर फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येतील. हा सुपर-४ सामना ग्रुप-अ मधून पात्र ठरलेल्या अव्वल दोन संघांमध्ये खेळला जाईल. भारत आधीच मजबूत स्थितीत आहे, आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानच्या कामगिरीवर आहेत.

केवळ सुपर-४ मध्येच नाही तर दोन्ही संघ अंतिम फेरीतही एकमेकांशी भिडू शकतात. सुपर-४ मध्ये सर्व संघ ३-३ सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतील. अशा परिस्थितीत, जर भारत आणि पाकिस्तानचे संघ टॉप-२ मध्ये राहिले तर ते जेतेपदाच्या सामन्यातही आमनेसामने येऊ शकतात. आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही सामना झालेला नाही.

गट अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये सध्या भारत पहिल्या स्थानावर असून दोन सामन्यांतून ४ गुण मिळवले आहेत. पाकिस्तानकडे दोन सामन्यांतून २ गुण आहेत. भारताने यूएई आणि पाकिस्तानवर मात केली आहे, तर पाकिस्तानने ओमानवर विजय मिळवला परंतु भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना नाट्यमय ठरला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. नाणेफेकीच्या वेळीही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन केले नाही. या घटनेवर पाकिस्तानच्या व्यवस्थापनाने तक्रार दाखल केली आहे.

सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासोबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती, ज्यामध्ये खेळाडू हस्तांदोलन करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता. पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू मैदानावर भारतीय खेळाडूंची वाट पाहत राहिले, मात्र टीम इंडियाचे खेळाडू थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

SCROLL FOR NEXT