Asaduddin Owaisi: Narendra Modi has still not uttered the word Taliban Dainik Gomantak
देश

मोदी 'तालिबान' हा शब्दही उच्चारत नाहीत: ओवेसींची जहरी टीका

असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांनी अफगाणिस्तान (Afghanistan) मुद्द्यावरूनही मोदींवर निशाणा साधला आहे

दैनिक गोमन्तक

एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांनी चीन (China)आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi)निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे पंतप्रधान मोदी बहिष्कार चीनबद्दल बोलतात, तर दुसरीकडे ते स्वतः चिनी व्यवसायाला प्रोत्साहन देतात. त्यांनी एकापाठोपाठ दोन ट्वीट करून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.(Asaduddin Owaisi: Narendra Modi has still not uttered the word Taliban)

चीनच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ट्विट केले की, "चीनवर मोदींच्या प्रवक्त्याने आर्थिक बहिष्काराची मागणी केली आणि भारतीयांना चिनी एजंट म्हटले. पण वास्तव हे आहे की मोदींचा चीनबरोबरचा व्यापार वाढला आहे तर इतर देशांसोबत तो कमी झाला आहे. मोदी चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहेत, तर चीनने भारतीय जमिनीवर कब्जा केलाआहे."

तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी अफगाणिस्तान (Afghanistan) मुद्द्यावरूनही मोदींवर निशाणा साधला आहे "अफगाणिस्तानात जा" आणि प्रत्येकाला "तालिबान" (Taliban) म्हणण्यास सांगतात. पण मोदी हे एकमेव आहेत जे अफगाणिस्तानात गेले आणि त्यांनी 3 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत . मोदींनी तालिबानची दहशतवादी संघटना (Terrorists) म्हणून अजूनही नोंद केली नाही तसेच मोदींनी अजून "तालिबान" शब्दही उच्चारला नाही." असे म्हणत त्यांनी सरकारला विशेषतः मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

काबूल, अफगाणिस्तानमधील परिस्थिती यावेळी अत्यंत नाजूक आहे. हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील भागात अनेक रॉकेट सोडण्यात आले आहेत. हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी रॉकेट हल्ल्याची माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी काबूलच्या सलीम कारवां भागात रॉकेट्स सोडली होती. स्फोटानंतर लगेच गोळीबाराचा आवाज ऐकू आला, पण गोळीबार कोणी केला हे लगेच स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT